IND vs PAK Asia cup 2018 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

IND vs PAK Asia cup 2018 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

रोहित शर्माचे शतक पूर्ण

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज दुसरा सामना संपन्न झाला. पाकिस्तानने दिलेल्या २३८ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर शिखर धवनने ११४ (बॉल १००) आणि कर्णधार रोहित शर्माने नाबाद १११ (बॉल ११९) धावा करत दोन शानदार शतक झळकावले. सलामीवीरांच्या शतकी भागिदारीमुळे भारताने या सामन्यात नऊ गडी राखून लीलया विजय मिळवला. पाकिस्तानला नमवत भारताने थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सुरुवातीपासून सामन्यावर सलामीवीरांची पकड होती. पाकिस्तानचे गोलंदाज दोघांच्याही आक्रमणापुढे अक्षरशः निष्प्रभ झाले होते. यातच पाकिस्तानच्या खेळाडूंनी तीन कॅचेस सोडल्या त्यामुळे ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे त्यांना सामना गमवावा लागला. या सामन्यात पाकिस्तानला मिळालेली एकमात्र विकेटही शिखर धवनच्या चुकीमुळेच मिळाली. जिंकण्यासाठी थोड्या धावा बाकी असताना शिखर धवन रन आऊट झाला होता. त्यानंतर आलेल्या अंबाती रायडूने रोहितला उत्तम साथ दिली आणि रोहित स्वतःचे शतक पूर्ण करत वन डे मध्ये स्वतःच्या सात हजार धावा पूर्ण केल्या.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकच्या फलंदाजांवर भारतीय गोलंदाज भारी पडले. पाककडून शोएब मलिक (७८) आणि कर्णधार सरफराज अहमद (४४) यांनी चांगली फलंदाजी करत पाकचा गडगडलेला डाव सावरला. या दोघांच्या चिवट फलांदाजीमुळे पाकला ७ गड्यांच्या बदल्यात २३७ धावसंख्या उभी करता आली. पाकने भारताला २३८ धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतातर्फे जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी केली. १० षटकात बुमराहने २९ धावा देत २ गडी बाद केले. त्याने एक निर्धाव षटकदेखील टाकले. त्याला यजुवेंद्र चहल आणि कुलदिप यादवने प्रत्येकी दोन बळी घेत साथ दिली.


प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकने संथ आणि सावध सुरूवात केली. ४ दिवसांपूर्वी उभय संघांमध्ये झालेल्या सामन्यात पाकचा दारुण पराभव झाला होता. त्यमुळे पाकचा संघ तणावात पहायला मिळाला. आठव्या षटकात यजुवेंद्र चहल याने पाकचा सलामीवीर इमाम उल हकला अवघ्या १० धावांवर असताना पायचित केले. तर कुलदिप यादवने १५ व्या षटकात पाकचा दुसरा सलामीवीर फकर जमान याला पायचित केले. फकरने ३१ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या बाबर आजमला रविंद्र जडेजा आणि चहलने ९ धावांवर धावबाद केले. १६ षटकात ३ बाद ५८ अशी पाकची अवस्था झालेली अतसाना पाकचा कर्णधार सरफराज अहमद आणि शोएब मलिकने पाकचा डाव सावरला. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या पाकच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. ५० षटकात पाकने २३७ धावा केल्या

First Published on: September 23, 2018 8:42 PM
Exit mobile version