IND vs SA, 3rd ODI : तिसऱ्या वनडेत सन्मान वाचवण्यासाठी उतरणार टीम इंडिया

IND vs SA, 3rd ODI : तिसऱ्या वनडेत सन्मान वाचवण्यासाठी उतरणार टीम इंडिया

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतावर ICC ची दंडात्मक कारवाई, काय आहे कारण?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन सामन्यांचा एकदिवसीय सामना केपटाऊनमध्ये खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाच्या हातून मालिका गेली आहे परंतु आपलान सन्मान वाचवण्यासाठी टीम मैदानावर उतरेल. या सामन्यात युवा खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात येऊ शकते. कर्णधार के एल राहुल ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि दिपक चाहरसारख्या खेळाडूंना खेळण्याची संधी देऊ शकतो. संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहला या सामन्यातून विश्रांती देण्यात येऊ शकते.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ यापूर्वी 2018 मध्ये एकदिवसीय मालिकेत आमनेसामने आला होता. त्यानंतर भारताने सहा सामन्यांची वनडे मालिका 5-1 अशी जिंकली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना 23 जानेवारी म्हणजेच रविवारी खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर होणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना IST दुपारी 2:00 वाजता सुरू होईल. टॉस त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच पहाटे 1.30 वाजता होईल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

रोहित शर्मा हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर झाला आहे. रोहितच्या गैरहजेरीमध्ये केएल राहुल वनडे इंटरनॅशनलमध्ये भारताचे नेतृत्व करेल. केएल राहुल कर्णधार म्हणून चांगली कामगिरी दाखवू शकला नाही. पहिल्या दोन सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.


हेही वाचा : Team India, New Test Captain : कोण होणार टेस्ट कॅप्टन, भारतीय संघाच्या माजी कर्णधाराकडून रोहितची शिफारस

First Published on: January 22, 2022 7:44 PM
Exit mobile version