Team India, New Test Captain : कोण होणार टेस्ट कॅप्टन, भारतीय संघाच्या माजी कर्णधाराकडून रोहितची शिफारस

भारतीय टीम पुढील महिन्याच्या शेवटाला श्रीलंकाविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. पहिला कसोटी सामना २५ फेब्रुवारी आणि दुसरा कसोटी सामना ५ मार्चला खेळवण्यात येणार आहे. अशामध्ये भारतीय क्रिकेट बोर्ड टेस्ट कर्णधारबाबत घाईत निर्णय घेऊ शकत नाही.

Team India New Test Captain M Azharuddin said rohit sharma is perfect for test captain
Team India, New Test Captain : कोण होणार टेस्ट कॅप्टन, भारतीय संघाच्या माजी कर्णधाराकडून रोहितची शिफारस

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने काही दिवसांपुर्वी कसोटी सामन्याच्या संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. कोहलीच्या राजीनाम्यानंतर आता भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण होणार याबाबत शोधाशोध सुरु आहे. भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत टेस्ट कर्णधारपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. यामध्ये आता भारतीय संघाचा माजी कर्णधार अजहरुद्दीनने रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली आहे.

विराट कोहलीने भारतीय संघाच्या टेस्ट टीमचे कर्णधारपद सोडलं आहे. यानंतर आता नवा कर्णधार कोण होणार यावर चर्चा सुरु आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांना योग्य वाटणाऱ्या खेळाडूंच्या नावाची कर्णधारपदासाठी शिफारस केली आहे. माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनने टेस्ट कर्णधारपदाबाबत मत व्यक्त केले आहे. रोहित शर्मा टेस्ट कर्णधारपदासाठी योग्य राहिल असे अजहरुद्दीन म्हणाला आहे. रोहित शर्मा हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर झाला आहे. रोहितच्या गैरहजेरीमध्ये केएल राहुल वनडे इंटरनॅशनलमध्ये भारताचे नेतृत्व करेल. केएल राहुल कर्णधार म्हणून चांगली कामगिरी दाखवू शकला नाही. पहिल्या दोन सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

बीसीसीआय जर रोहित शर्माकडे टेस्ट टीमचा कॅप्टन केल तर तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचा एकच कर्णधार असेल. असे झाले तर रोहित शर्मा कोहली आणि धोनीनंतर तिन्ही फॉर्मेटमध्ये नेतृत्व करणारा तिसरा खेळाडू ठरेल

भारतीय टीम पुढील महिन्याच्या शेवटाला श्रीलंकाविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. पहिला कसोटी सामना २५ फेब्रुवारी आणि दुसरा कसोटी सामना ५ मार्चला खेळवण्यात येणार आहे. अशामध्ये भारतीय क्रिकेट बोर्ड टेस्ट कर्णधारबाबत घाईत निर्णय घेऊ शकत नाही.

हेही वाचा : IPL 2022 Date and Venue: महाराष्ट्रातील दोन शहरांत होणार IPL सामने, कधी होणार आयपीएलची सुरुवात?