IND vs SA : टी-20 क्रिकेटमध्ये नवा विक्रम करण्यासाठी माजी कर्णधार विराट सज्ज

IND vs SA : टी-20 क्रिकेटमध्ये नवा विक्रम करण्यासाठी माजी कर्णधार विराट सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेशी लढण्यास सज्ज झाला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यातील विराट कोहलीच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत रोहित शर्मा टॉपवर आहे. तसेच, विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे विराट कोहलीला या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला मागे टाकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आजच्या सामन्यात विराट कोहलीने 35 धावा केल्यास त्याच्या नावावर या विक्रमाची नोंद होणार आहे. कारण आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 3 हजार 694 धावांची नोंद आहे. तर, विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 107 सामन्यात 3 हजार 660 धावा केल्या आहेत.

या यादीत न्यूझीलंड तडाखेबाज फलंदाज मार्टिन गप्टिल 3 हजार 497 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग 3 हजार 11 धावांसह चौथ्या आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 2 हजार 939 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. (ind vs sa indian former captain virat kohli will make new record by breaking rohit sharma record)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेपूर्वी पार पडलेल्या आशिया चषकात विराट कोहलीने तुफानी फलंदाजी केली. जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले.


हेही वाचा – 1947 सालापासून ‘मांकडिंग’ असताना आता वाद का?

First Published on: September 28, 2022 5:38 PM
Exit mobile version