IND vs WI 3rd ODI Live : वेस्ट इंडिज विजयी

IND vs WI 3rd ODI Live : वेस्ट इंडिज विजयी

वेस्ट इंडिज

 

 

 


 

या विजयासोबतच त्यांनी ५ सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.


कोहली बाद झाल्यावर इतर फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे विंडीजने हा सामना ४३ धावांनी जिंकला.


१०७ धावा करून कोहली बाद झाला. त्याला सॅम्युएल्सने बाद केले.


कोहलीने मालिकेतील सलग तिसरे शतक लगावले आहे. वनडेमध्ये सलग तीन शतक करणारा तो एकमेव भारतीय आहे.


धोनी ७ धावा करून बाद झाला.


रिषभ पंतला नर्सने बाद केले. पंतने १८ चेंडूंत २४ धावा केल्या. भारताला जिंकण्यासाठी अजून ११२ धावांची गरज आहे.


आंबटी रायडू २२ धावांवर बाद झाला.


चांगल्या फलंदाजीनंतर शिखर ३५ धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताच्या फलंदाजीची भिस्त पहिल्या दोन्ही सामन्यांत शतक करणाऱ्या कर्णधार कोहलीवर आहे.


भारताच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी सलामीवीर रोहित शर्माला ८ धावांवर गमावले.


भारताकडून पुनरागमन करणाऱ्या बुमराहने ४ तर कुलदीप यादवने २ विकेट घेतल्या.


जेसन होल्डर आणि ऍशली नर्स यांनी शेवटच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजने ५० षटकांत ९ बाद २८३ धावा केल्या.


शाई होपच्या ९५ धावा करून बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने बाद केले.


दुसऱ्या वन डे मध्ये तडाखेबाज बॅटींग करुन भारतीय गोलंदाजांना धडकी भरवणारा हेटमायर आज लवकर माघारी गेला. कुलदीप यादवच्या फिरकीवर धोनीने उत्तमरीत्या स्टम्पिंग केली. आजही हेटमायर आक्रमक खेळी करत होता. केवळ २१ चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकार लगावत त्याने ३७ धावा केल्या.


बुमराहने दोन फलंदाजाना माघारी धाडल्यानंतर खलील अहमदने विंडीजच्या तिसरा बळी घेतला आहे. मार्लन सॅम्युअल्सला माघारी धाडले आहे. सॅम्युअल्स केवळ ९ धावा करुन आऊट झाला.


विंडीजने सामन्याची सुरुवात काहीशी संथगतीने सुरु केली होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचे दोन फलंदाज तबंत परतले आहेत. दोन्ही फलंदाजांना बुमराहनं माघारी धाडण्यात यश मिळवलं आहे. पुण्यात होणाऱ्या आजच्या सामन्यामध्ये भारताचं पारडं जड आहे.


भारत विरुद्ध विंडीज दरम्यान सुरु असलेली वन डे मालिका रोमहर्षक वळणावर आलेली आहे. आज पाच सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना पुणे येथे होत आहे. दुसरा सामना टाय झाल्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच थोडक्यात सामना जिंकता जिंकता राहिल्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ कसा खेळ करतात, हे पाहणे देखील औत्सुक्याचे राहणार आहे. आज पुणे येथे कर्णधार विरोट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून विराटने प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय अंगलट आल्याने यावेळी विराटने आपली चूक सुधारली आहे. मात्र याचा परिणाम सामना संपतानाचा कळेल.

आजच्या सामन्यात तीन बदल करण्यात आलेले आहेत. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि खलील यांना आजच्या सामन्यात स्थान देण्यात आले आहे. तर मोहम्मद शामी, उमेश यादव आणि रवींद्र जाडेजाला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.

 

 

 

First Published on: October 27, 2018 1:44 PM
Exit mobile version