सचिन अाणि सेहवागने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या अनोख्या शुभेच्छा

सचिन अाणि सेहवागने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या अनोख्या शुभेच्छा

सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग

आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आज भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिवस असल्याने देशभरात देशभक्तीचे वातावरण दिसून येत आहे. अगदी सोशल मीडियाही देशभक्तीच्या रंगात रंगलेला दिसून येत आहे. आजच्या या महत्त्वाच्या दिवशी भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर सचिन आणि सेहवाग यांनीही भारतीयांना आपल्या सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आपले देशप्रेम व्यक्त केले आहे.

शूरवीरांच्या बलिदानमुळेच आज टीम इंडिया अस्तित्वात – सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून पोस्ट करत भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या पोस्टमधून शहीदांची आठवण काढली आहे. त्याने लिहीले आहे की, “भारताच्या शहीदांनी आपले बलिदान केले म्हणूनच भारताला स्वतंत्र मिळाल आणि त्यामुळेच आज टीम इंडियाही अस्तित्वात आहे


कवितेच्या माध्यमातून सेहवागने दिल्या शुभेच्छा

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग नेहमीच आपल्या सोशल मीडियावरील हटके ट्विट्समुळे चर्चेत असतो. आजही स्वांतत्र्या दिनादिवशी सेहवागने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून पोस्ट केली आहे. ज्यात त्याने एक अप्रतिम देशप्रेमी कविता लिहीत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

First Published on: August 15, 2018 2:19 PM
Exit mobile version