IND vs ENG : अखेरच्या दोन कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हा’ मुंबईकर खेळाडू संघाबाहेर

IND vs ENG : अखेरच्या दोन कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हा’ मुंबईकर खेळाडू संघाबाहेर

इंग्लंडविरुद्ध अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी बुधवारी भारताने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत हाताला दुखापत झाल्यामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळता आले नव्हते. मात्र, तो अखेरच्या दोन सामन्यांसाठी फिट होईल अशी भारतीय संघ व्यवस्थापनाला आशा होती. परंतु, शमीला पूर्णपणे फिट होण्यासाठी आणखी काही काळ लागणार असल्याने त्याला अखेरच्या दोन सामन्यांसाठीही संधी मिळालेली नाही. उमेश यादवचे मात्र पुनरागमन झाले आहे. त्याची मुंबईकर शार्दूल ठाकूरच्या जागी संघात निवड झाली आहे. उमेशला संघात स्थान मिळाले असले तरी त्याची आधी फिटनेस चाचणी होणार आहे.

२४ फेब्रुवारीपासून डे-नाईट कसोटी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेचे अखेरचे दोन्ही सामने अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियममध्ये होणार आहेत. तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारीपासून डे-नाईट (प्रकाशझोतात) होणार आहे. या दोन्ही सामन्यांत विराट कोहलीच भारताचे नेतृत्व करणार असून अजिंक्य रहाणे उपकर्णधार आहे. तसेच या संघात अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंचा समावेश आहे. शार्दूल ठाकूरला संघात स्थान मिळाले नसून तो आता विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळेल.

शार्दूल ठाकूर

हेही वाचा – अहमदाबाद डे-नाईट कसोटी ‘हाऊसफुल’; सौरव गांगुलीची माहिती


 

First Published on: February 17, 2021 4:12 PM
Exit mobile version