IND vs SL 3rd T20: भारताचा श्रीलंकेवर 91 धावांनी दमदार विजय

IND vs SL 3rd T20: भारताचा श्रीलंकेवर 91 धावांनी दमदार विजय

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर 91 धावांनी दमदार विजय मिळवला. हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडला. यावेळी भारतीय संघाने हा सामना 91 धावांनी जिंकून मालिका 2-1 ने जिंकली. भारतीय संघाचा वेगवान फलंदाज सूर्यकुमार यादवने नाबाद 112 धावा केल्या. तर अर्शदीप सिंहने 3, उमरान मलिक, हार्दिक पांड्या आणि चहल यांनी प्रत्येकी 2, तसेच अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत एक मोठी धावसंख्या उभारली. सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 112 धावा केल्या. त्याने 51 चेंडूत 9 षट्कार, 7 चौकार ठोकत नाबाद 112 धावा केल्या. इशान किशन 1 धाव करू शकला. त्यानंतर त्रिपाठी 35 धावा करून बाद झाला. शुभमन गिल आणि सूर्यकुमार कुमार यांनी तिसऱ्या विकेटसाठी 53 चेंडूत 111 धावांची भागीदारी करु शकले. तर गिल 46 धावा करुन बाद झाला.

अक्षरच्या नाबाद 21 धावांनी भारताची धावसंख्या 228 पर्यंत गेली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षट्कांत 5 गडी गमावून 228 धावा केल्या. मात्र, प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 16.4 षट्कांत 137 धावांवरच गारद झाला. मुंबईतील पहिला टी20 सामना भारताने जिंकला होता. तर पुण्यातील दुसरा सामना श्रीलंकेने जिंकून मालिकेत पुनरागमन केले होते. पण तिसरा सामना श्रीलंकेला जिंकता आला नाही. त्यामुळे भारताने श्रीलंकेचा पराभव करत मालिका 2-1 ने खिशात घातली.


हेही वाचा :निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा कायम, BCCIकडून पाच सदस्यीय समितीची घोषणा


 

First Published on: January 7, 2023 10:59 PM
Exit mobile version