घरक्रीडानिवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा कायम, BCCIकडून पाच सदस्यीय समितीची घोषणा

निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा कायम, BCCIकडून पाच सदस्यीय समितीची घोषणा

Subscribe

बीसीसीआयने पाच सदस्यीय समितीची घोषणा केली आहे. यामध्ये चेतन शर्मा यांना पुन्हा एकदा निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. टी-२० विश्वचषकात टीम इंडियाच्या सुमार कामगिरीमुळे चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु आता चेतन शर्मा यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.

चेतन शर्मा यांच्या व्यतिरिक्त शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन सैराट यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या पाच पदांसाठीच्या जाहिरातीनंतर मंडळाला सुमारे ६०० अर्ज प्राप्त झाले होते. CAC ने वैयक्तिक मुलाखतीसाठी ११ उमेदवारांची निवड केली होती.

- Advertisement -

निवड समितीची निवड क्रिकेट सल्लागार समिती करते. चेतन शर्मा यांची पुन्हा एकदा निवड समितीचे अध्यक्ष असतील, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

- Advertisement -

मागील निवड समितीच्या कार्यकाळात टीम इंडियाला कोणतेही मोठे यश मिळाले नव्हते. आशिया चषक, दोन टी-२० विश्वचषकातील पराभवाशिवाय इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पराभवाने सर्वांनाच हैराण केले होते. यादरम्यान निवड समितीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

सध्या टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. त्यानंतर वनडे मालिकाही खेळवण्यात येणार आहे. नव्या निवड समितीसमोर आता न्यूझीलंड मालिकेसाठी संघ निवडीचे आव्हान असणार आहे.


हेही वाचा : ऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; आठ ते नऊ महिने खेळ नाही


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -