ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार, सामन्यापूर्वी प्रेक्षकांना बसणार धक्का…

ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार, सामन्यापूर्वी प्रेक्षकांना बसणार धक्का…

भारत-पाकिस्तान सामना रंगणार; तिकिटे दोन दिवसांत संपले

ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघातील थरार येत्या 23 ऑक्टोबरला मेलबर्नच्या मैदानात पहायला मिळणार आहे. परंतु हा सामना सुरू होण्यापूर्वीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे हा सामना काही प्रेक्षकांना पाहता येणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

बऱ्याच कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चषकाचा सामना होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ती म्हणजे हा सामना आता काही प्रेक्षकांना पाहता येणार नाहीये. त्यामुळे काही चाहत्यांमध्ये निराशाजनक वातावरण निर्माण झालं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मेलबर्न येथे होणाऱ्या सामन्याची सर्व तिकिटं विकली गेली आहे. मेलबर्न या मैदानाची आसन क्षमता ही 1 लाख एवढी आहे. आयसीसीने सुरुवातीला काही तिकिटंच विक्रीला काढली होती. पण ही तिकिटं आता काही क्षणात विकली गेली आहेत.

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने खेळवण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या सामन्यात भारताने हा सामना सहज जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना हा सुपर-4 फेरीत खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. परंतु आता ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारतीय संघ काय कमाल करणार, याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.


हेहीै वाचा : पाकिस्तानचे पंच असद रऊफ यांचे


 

First Published on: September 15, 2022 7:13 PM
Exit mobile version