घरक्रीडापाकिस्तानचे पंच असद रऊफ यांचे निधन

पाकिस्तानचे पंच असद रऊफ यांचे निधन

Subscribe

नवी दिल्ली – आयसीसीच्या एलिट पॅनेलचा भाग असलेले पाकिस्तानी पंच असद रऊफ (६६) यांचे बुधवारी लाहोरमध्ये निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वृत्ताला त्याचा भाऊ ताहिर याने दुजोरा दिला आहे. त्यांच्या भावाने सांगितले की, मृत्यूपूर्वी ते दुकान बंद करून घरी जात होते. मात्र, अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यातून ते वाचू शकले नाहीत.

2006 ते 2013 या काळात असद रऊफ आयसीसीच्या एलिट अंपायर पॅनेलचे सदस्य होते. मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला होता. फेब्रुवारी 2016 मध्ये बीसीसीआयने असद रऊफयांना भ्रष्टाचारात त्यांना दोषी ठरवले होते. त्यामुळे त्याच्यावर 5 वर्षांची क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती.

- Advertisement -

असद रऊफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकूण 231 सामन्यांमध्ये अंपायरिंग केले आहे. त्यात 64 कसोटी, 28 टी-20 आणि 139 एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. पाकिस्तानी पंच 2013 मध्ये सर्व प्रकारच्या अंपायरिंगमधून निवृत्त झाले होते. असद रऊफ यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करत आहेत. तर रऊफचे चाहतेही त्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत आहेत आणि त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करत आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -