भारत-न्यूझीलंडच्या सामन्यात पावसाची तुफान बॅटिंग, मालिका जिंकण्याच्या भारताच्या आशा मालवल्या

भारत-न्यूझीलंडच्या सामन्यात पावसाची तुफान बॅटिंग, मालिका जिंकण्याच्या भारताच्या आशा मालवल्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. परंतु या सामन्यात पावसाने तुफान बॅटिंग केल्यामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. हॅमिल्टनच्या मैदानावर आज सकाळपासून पावसाने सुरूवात केली होती. त्यामुळे नाणेफेक देखील उशीरा करण्यात आली.

पहिल्या ४.५ ओव्हर्स झाल्यानंतर पाऊस पडला. परंतु काही तासानंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली. जो सामना २९ ओव्हर्सचा होता. मात्र, पुन्हा एकदा पावसाने १२.५ ओव्हर्सनंतर सामन्यात प्रचंड व्यत्यय आणला. पंच आणि सामनाधिकारी यांना सामना रद्द करण्यास भाग पाडले.

भारताने एक विकेट गमावून ८९ धावा केल्या होत्या. शुभमन गिलने ४५ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत ३४ धावा केल्या. सामन्यात पाऊस पडल्यानंतर आणि हा सामना रद्द झाल्यानंतर मालिका जिंकण्याच्या भारतीय संघाच्या आशा मालवल्या आहेत. किवी संघ ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. तसेच एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना ३० नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.

भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये २ बदल केले होते. शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहर आणि संजू सॅमसनच्या जागी दीपक हुड्डाचा समावेश करण्यात आला होता.


हेही वाचा : IND vs NZ : मालिकेत टिकण्यासाठी भारताला उद्याचा सामना जिंकावाच लागणार


 

First Published on: November 27, 2022 2:59 PM
Exit mobile version