IND vs WI : दुसऱ्यापाठोपाठ तिसऱ्याही टी-२० सामन्याची वेळ बदलली

IND vs WI : दुसऱ्यापाठोपाठ तिसऱ्याही टी-२० सामन्याची वेळ बदलली

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आली आहे. सोमवारी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना झाला. हा सामाना रात्री १०:३० वाजता सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या सामन्यासाठी वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, या सामन्याचा टॉस आता ८ ऐवजी ९ वाजता होणार आहे. म्हणजे मॅच मधील पहिला चेंडू रात्री ९:३० वाजता टाकला जाणार आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याची वेळ

भारत आणि वेस्ट इंडिज मधील तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ९:३० वाजता सामना सुरु होणार आहे. तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळेत झालेल्या बदलाबद्दल बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने टि्वट करत सामन्याच्या वेळेत बदल झाल्याची माहिती दिली.

दुसरा टी-२० सामना उशिराने सुरु

या संदर्भातील अधिक माहितीनुसार, सर्व खेळाडूंना आराम मिळण्यासाठी तिसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आल्याचे समजते. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-२० सामना उशिराने सुरु झाला. त्यामुळे खेळाडूंना थकवा जाणवू नये, यासाठी तिसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला.

फ्लोरिडामध्ये शेवटचे दोन सामने होणार

संघाचे सामान वेळेवर न पोहोचल्यामुळे दुसरा टी-२० सामनाही उशिराने सुरु झाला होता. दोन्ही संघ तिसरा टी-२० सामना उशिराने सुरु करण्यावर सहमत आहेत. खेळाडूंना आराम मिळावा, हा त्यामागे हेतू आहे. हा निर्णय घेण्याआधी फ्लोरिडामध्ये होणाऱ्या सलग दोन सामन्यांबद्दलही विचार करण्यात आला आहे. फ्लोरिडामध्ये शेवटचे दोन सामने होणार आहेत. याबाबत क्रिकेट वेस्ट इंडीजने स्पष्च केले आहे.

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील वनडे मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता खेळवण्यात आले. त्याचवेळी टी-२० मालिकेतील सामन्यांची वेळ रात्री ८ वाजल्यापासून ठेवण्यात आली होती. रात्री आठ वाजल्यापासून उभय संघांमधला पहिला टी-२० सामना खेळवण्यात आला, मात्र आता अचानक दुसऱ्या टी-२०च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.


हेही वाचा – राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोत भारताच्या सुशीला देवीने पटकावले रौप्यपदक

First Published on: August 2, 2022 3:39 PM
Exit mobile version