WTC Final : भारतीय खेळाडूंना तीन दिवस एकमेकांना भेटण्याची परवानगी नाही; फिरकीपटूची माहिती

WTC Final : भारतीय खेळाडूंना तीन दिवस एकमेकांना भेटण्याची परवानगी नाही; फिरकीपटूची माहिती

भारतीय खेळाडूंना तीन दिवस एकमेकांना भेटण्याची परवानगी नाही

भारतीय संघ गुरुवारी इंग्लंडमध्ये दाखल झाला असून खेळाडू साऊथहॅम्पटन येथे तीन दिवस क्वारंटाईन असणार आहेत. तसेच या तीन दिवसांत खेळाडूंना एकमेकांना भेटण्याची परवानगी नसेल. त्यानंतर खेळाडूंना साऊथहॅम्पटनच्या एजिस बोल मैदानात सराव करता येणार आहे. याबाबतची माहिती भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने दिली. भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्याने होणार आहे. हा सामना साऊथहॅम्पटन येथेच १८ जूनपासून खेळला जाणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. याऊलट अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला सरावासाठी मर्यादित वेळच मिळणार आहे.

चार्टर्ड विमानाने गाठले इंग्लंड

मला चांगली झोप लागली. आता आम्हाला क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. आम्हाला पुढील तीन दिवस एकमेकांना भेटता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे, असे अक्षर म्हणाला. भारतीय संघाने चार्टर्ड विमानाने भारताहून इंग्लंडचा प्रवास केला. याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवरून शेअर केला. भारताचे पुरूष आणि महिला या दोन्ही संघांनी एकाच चार्टर्ड विमानाने इंग्लंड गाठले.

मैदानातच असलेल्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन

भारताचे संघ आधी इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांना बसने साऊथहॅम्पटन येथे नेण्यात आले. साऊथहॅम्पटनच्या एजिस बोल मैदानातच हॉटेल असून त्यात खेळाडू क्वारंटाईन असणार आहे. भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा, फलंदाज चेतेश्वर पुजारा, वेगवान गोलंदाज उमेश यादव यांसारख्या खेळाडूंनी आपल्या हॉटेलमधील खोलीतून मैदान दिसत असल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

First Published on: June 4, 2021 2:54 PM
Exit mobile version