पदार्पणावरून कपील देव यांचा अर्जुन तेंडुलकरला महत्वाचा सल्ला; म्हणाले, ‘सचिनच्या ५० टक्के जरी बनला…’

पदार्पणावरून कपील देव यांचा अर्जुन तेंडुलकरला महत्वाचा सल्ला; म्हणाले, ‘सचिनच्या ५० टक्के जरी बनला…’

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला आयपीएलमध्ये मुंबईच्या (Mumbai Indians) संघातून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याचे आयपीएल पदार्पणही लांबले. परंतु, सराव करताना गोलंदाजीत कमतरता भासत असल्याने त्याला अद्याप संघाता स्थान न मिळाल्याचे बोलले जात आहे. यावर अनेक खेळाडूंनी आपली मतं व्यक्त करत त्याला सल्ले दिले. त्यानंतर आता भारताचे माजी वर्ल्डकप विजेते कर्णधार कपील देव (kapil Dev) यांनी अर्जुनला सल्ला दिला आहे.

एका कार्यक्रमात कपील देव यांना अर्जुनच्या पदार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले, ‘अर्जुन सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने सर्वजण त्याच्याबद्दल बोलत आहेत का? त्याला त्याचे काम करू द्या. त्याची तुलना सचिनशी करू नका. तेंडुलकर नावाचे फायदे आणि तोटे देखील आहेत. ब्रॅडमनच्या मुलाने त्याचे नाव बदलले. कारण तो त्या नावाचा दबाव झेलू शकला नाही. त्याने वडिलांसारखे व्हावे अशी सर्वांची अपेक्षा होती. त्यामुळे अर्जुनवर दबाव टाकू नका. तो एक तरूण खेळाडू आहे. महान क्रिकेटपटू सचिन त्याचे वडील आहेत. तर आपण त्याला सांगणारे कोण आहेत. तरीही मी त्याला सांगू इच्छितो की, मैदानात जा आणि खेळाचा आनंद घे. काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तो सचिनच्या ५० टक्के जरी बनला तरी त्याच्यापेक्षा चांगले काहीही नसेल. सचिन अत्यंत महान होता. त्यामुळे तेंडुलकर नाव आले की आपल्या अपेक्षा वाढतात’, असे कपिल यांनी म्हटले.

हेही वाचा – IPL 2022: ‘अपना टाईम आएगा…’, भाऊ अर्जुनसाठी सारा तेंडुलकरची भावनिक पोस्ट

कपील देव यांच्या पूर्वी मुंबई इंडियन्स संघाचा बॉलिंग कोच शेन बॉण्ड यांनीही अर्जुनला सल्ला दिला होता. तसेच, या पर्वात त्याला का खेळवले नाही, याचेही कारण दिले. ‘अर्जुन तेंडुलकरला अजून बरीच सुधारणा करावी लागणार आहे. तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या संघाकडून खेळता तेव्हा स्क्वॅडमध्ये असणे वेगळे आणि प्लेइंग ११मध्ये संधी मिळणे वेगळे असते. त्याला अजून बरेच सुधारावे लागणार आहे. त्याच्यावर अजून बरेच काम करण्याची गरज आहे. त्याला फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तो सुधारणा करेल, अशी अपेक्षा आहे,’ असं कारण बॉन्डनं सांगितलं आहे.


हेही वाचा – दिवंगत शेन वार्नच्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ला २९ वर्ष पूर्ण

First Published on: June 4, 2022 2:33 PM
Exit mobile version