रहाणे-अश्विन वर्ल्डकपमधून आऊट; आज राजस्थान-पंजाबची लढत

रहाणे-अश्विन वर्ल्डकपमधून आऊट; आज राजस्थान-पंजाबची लढत

तिकडे गेल तर इकडे बटलर

बीसीसीआयने सोमवारी वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर केला. परंतु, त्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन यांना स्थान देण्यात आलेले नाही. आज हे दोन्ही कर्णधार आयपीएलच्या स्पर्धेत समोरासमोर येणार आहेत. राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात आयपीएलच्या १२ व्या मोसमातील ३२ वा सामना खेळला जाणार आहे. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मात्र, दोन्ही संघापुढे ख्रिस गेल आणि जोस बटलर सारखे आक्रमक फलंदाजांना थांबवण्याचे मोठे आव्हान आहे. या फलंदाजांना थांबावता आले तर आजचा सामना फार काळ चालणार नाही. त्यामागे कारण ही अगदी तसेच आहे. पंजाबचे सलामीवीर लोकेश राहुल आणि ख्रिस गेल वगळता मधल्या फळीतील फलंदाजांना आपल्या खेळीत सातत्य ठेवता आलेले नाही. त्यामुळे या दोघांना थांबवण्यात राजस्थानला यश मिळाले तर आजचा डाव राजस्थानचाच असणार आहे.

पंजाबच्या गोलंदाजांपुढे बटलरला थांबवण्याचे आव्हान

राजस्थानचा संघ या मोसमात चांगली खेळू साकारु शकलेला नाही. या मोसमात आतापर्यंत राजस्थान ७ सामन्यांपैकी फक्त २ सामना जिंकू शकला आहे. त्यामुळे राजस्थानला जर प्ले ऑफमध्ये यायचं असेल तर यापुढचे सर्व सामने राजस्थानला जिंकावे लागणार आहेत. राजस्थानने गेल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे राजस्थानचा आत्मिश्वास बळावला आहे. मात्र, या मोसमातील राजस्थानची कामगिरी पाहता राजस्थानचा पूर्ण संघ हा जोस बटलसरवर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जोस बटलरची आक्रमक खेळी थांबवणे हे राजस्थानच्या गोलंदाजांपुढे मोठे आव्हान असणार आहे.

गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

राजस्थानच्या गोलंदाजांची चांगली फळी आहे. सध्या फिरकीपटू श्रेयस गोपाळ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्याला धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकर आणि जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंगाजांची साथ मिळणार आहे. दुसरीकडे पंजाबच्या संघात मोहम्मद शमी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. यासोबतच कर्णधार रविचंद्रन अश्विन, अॅंड्र्यू टाय, सॅम करण आपल्या परिने फलंदाजांना धूळ चारण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यात त्यांना फारसे यश मिळताना दिसत नाही.

First Published on: April 16, 2019 9:18 AM
Exit mobile version