RR vs CSK: रॉयल खेळीपुढे चेन्नई सुपर फ्लॉप; राजस्थानची विजयी सलामी

RR vs CSK: रॉयल खेळीपुढे चेन्नई सुपर फ्लॉप; राजस्थानची विजयी सलामी

संजू सॅमसनची झुंजार फलंदाजी आणि त्याला मिळालेली स्टिव्ह स्मिथची साथ यामुळे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला १६ धावांनी पराभूत करत आयपीएलच्या १३ व्या मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. शारजाह मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चेन्नईच्या अंगलट आला. संजू सॅमसनने षटकारांचा पाऊस पाडत धोनीचा निर्णय सिद्ध चूकिचा ठरवला.

राजस्थानने संजू सॅमसन आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नई संघ २० षटकांत ६ विकेट गमावून २०० धावाच करू शकला. राजस्थानने हा सामना १६ धावांनी जिंकला.

 

First Published on: September 22, 2020 11:49 PM
Exit mobile version