IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जला धक्का, 14 कोटींचा वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या मोसमातून बाहेर

IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जला धक्का, 14 कोटींचा वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या मोसमातून बाहेर

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये 4 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला 15 वा हंगाम (IPL-2022) सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसलाय. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर आगामी हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. याचे कारण त्याच्यावरील शस्त्रक्रिया असून, एप्रिलच्या मध्यापर्यंत तो मॅचसाठी फिट होण्याची शक्यता आहे. सध्या त्याचे बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे पुनर्वसन सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपक चहरची शस्त्रक्रिया झालेली नाही आणि तो सामने खेळण्यास फिट होण्यासाठी पुनर्वसन करणार आहे. मात्र, एप्रिलच्या मध्यापर्यंत तो तंदुरुस्त होऊ शकेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेदरम्यान चहरला क्वाड्रिसेप स्नायूंमध्ये (मांडीचे स्नायू) ताण आला होता. यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकला नाही. ToE च्या अहवालानुसार, शस्त्रक्रियेची योजना विचारात घेतली गेली आहे आणि चहर एप्रिलच्या मध्यापर्यंत निवडीसाठी उपलब्ध असावा.

टीम दीपक चहरच्या फिटनेसवर लक्ष ठेवणार

चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला दीपक चहरने पुढील काही आठवड्यात सुरतमधील त्यांच्या शिबिरात सामील व्हायचे आहे. यावरून फ्रँचायझी या वेगवान गोलंदाजाच्या फिटनेसवर बारीक लक्ष ठेवू इच्छित असल्याचे स्पष्ट झाले. दीपकला लवकरात लवकर तंदुरुस्त करून त्याचा संघ मजबूत करण्याची संघाची योजना आहे. 2018 च्या मोसमापासून चहर CSK चा महत्त्वाचा भाग आहे.

CSK ने 14 कोटींना विकत घेतले

दीपक चहरच्या महत्त्वाचा अंदाज यावरून लावता येतो की, चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यावर मोठी बोली लावली होती. या वेगवान गोलंदाजाला मेगा लिलावात पुन्हा सामील करून घेण्यासाठी चेन्नईने 14 कोटींची जोरदार बोली लावली होती. लिलावात खेळाडू विकत घेण्यासाठी CSK ने 10 कोटींहून अधिक खर्च करण्याची ही पहिलीच वेळ होती.


हेही वाचाः मुख्यमंत्री आणि राज्यपाल दोन प्रमुख घटनात्मक पदं एकमेकांसोबत नाहीत हे राज्याचं दुर्दैव, हायकोर्टाची नाराजी

First Published on: March 9, 2022 1:56 PM
Exit mobile version