IPL 2023 : LSG ला आणखी एक धक्का; 7.50 कोटी घेतलेला खेळाडू परतला मायदेशी

IPL 2023 : LSG ला आणखी एक धक्का; 7.50 कोटी घेतलेला खेळाडू परतला मायदेशी

नवी दिल्ली : आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाचा कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर संघाला आणखी एक धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark Wood) वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला आहे. त्याने ट्विटर अकाउंटवरून अधिकृत माहिती दिली आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने 4 षटकात 14 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. लखनऊ संघाने वुडला आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात संधी दिली असून त्याने 11 विकेट घेतल्या आहेत. चांगली कामगिरी करूनही त्याला प्रत्येक सामन्यात संधी मिळाली नाही. नुकत्याच झालेल्या 51 व्या सामन्यात त्याला संघातून बाहेर बसवले होते. पण अलीकडेच लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मार्क वुड स्वत: मायदेशी जात असल्याचे सांगताना दिसत आहे.

मार्क वुड व्हिडिओमध्ये म्हणाला की, माझ्या मुलीच्या जन्मासाठी मी घरी जात आहे. संघ सोडत असल्याचे जाहीर करताना मला दुःख होत असले तरी घरी जाण्याचे एक चांगले कारण माझ्यासाठी आहे. मी घरी जात असलो तरी लवकरच  पुन्हा संघासोबत जोडला जाईन अशी आशा आहे. मात्र या गोष्टीचं खेद वाटतं की, मी 4 सामन्यांत फार काही साध्य करू शकलो नाही. मी काही विकेट घेतल्या, पण अजून चांगली कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करेन.

अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष
मार्क वुड म्हणाला की, संघ खूप चांगला आहे. सपोर्टिंग स्टाफ, कोच सगळे छान आहेत. सहकारी खेळाडूंना वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करताना पाहून मला आनंद होतो आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आम्हाला आणखी एका विजयाची गरज आहे, हे मला माहित आहे. त्यानंतर अंतिम फेरी गाठण्याचे संपूर्ण संघाचे लक्ष्य आहे आणि ते इतके सोपे नाही, हेही मला माहिती आहे. खेळात जिंकण्याची आणि हरण्याची प्रक्रिया सुरू असते, पण आमचे खेळाडू अंतिम फेरीत जाण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत.

First Published on: May 8, 2023 3:09 PM
Exit mobile version