आयपीएलमध्ये केदार जाधवची अचानक एन्ट्री; ‘या’ संघातून पुनरागमन

आयपीएलमध्ये केदार जाधवची अचानक एन्ट्री; ‘या’ संघातून पुनरागमन

केदार जाधव

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16व्या हंगामात आतापर्यंत अनेक विक्रमी खेळी झाली आहे. एकीकडे आयपीएलमधील सर्व सामने रोमांचक होत आहेत तर, दुसरीकडे एकपाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहे. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू डेविड विली दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे. आरसाबीने डेविड विलीची रिप्लेसमेंट जाहीर केली आहे. मराठमोळ्या केदार जाधवला आरसीबीने आपल्या ताफ्यात घेतले आहे. (ipl 2023 rcb named kedar jadhav as replacement for david willey)

आयपीएलच्या यंदाच्या लिलावत केदार जाधव अनसोल्ड राहिला होता. त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. जिओ सिनेमासाठी केदार जाधव मराठीतून कॉमेंट्री करत होता. उर्वरित आयपीएल सामन्यासाठी केदार जाधवला बंगळुरूने आपल्या ताफ्यात घेतले आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात डेविड विली याने फक्त तीन सामने खेळले आहेत. या तीन सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या आहेत.


हेही वाचा – IPL 2023 : आजच्या सामन्यावर पावसाचे संकट; लखनऊ-आरसीबी सामना रद्द होण्याची शक्यता

First Published on: May 1, 2023 10:11 PM
Exit mobile version