‘नो सेफ्टी’ वर्ल्ड सिरीज; चौथ्या क्रिकेटपटूला कोरोनाची बाधा 

‘नो सेफ्टी’ वर्ल्ड सिरीज; चौथ्या क्रिकेटपटूला कोरोनाची बाधा 

युसूफ पठाण आणि इरफान पठाण 

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ही माजी क्रिकेटपटूंची स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत खेळलेल्या तब्बल चार भारतीय क्रिकेटपटूंना कोरोना बाधा झाली आहे. सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण आणि एस. बद्रीनाथनंतर आता इरफान पठाणलाही कोरोना झाला आहे. इरफानने स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली. ‘माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मी स्वतःला घरीच क्वारंटाईन केले आहे. मागील काही काळात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती,’ असे इरफान त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. तसेच त्याने सर्वांना मास्क घालण्याचे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

या स्पर्धेबाबत बरेच प्रश्न 

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ही खासगी स्पर्धा होती. केवळ माजी क्रिकेटपटूंचा समावेश असल्याने या स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआयच्या परवानगीची आवश्यकता नव्हती. मात्र, आता या स्पर्धेबाबत बरेच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. नुकतीच भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिका झाली. बीसीसीआयने या मालिकेतील बहुतांश सामने हे प्रेक्षकांविना घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, असे असतानाही रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेत सर्व सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली होती. या प्रेक्षकांनी मास्क घातले नव्हते. त्यामुळे या स्पर्धेवर आता टीका होत आहे.

First Published on: March 30, 2021 2:55 PM
Exit mobile version