ISSF World Championships : भारताच्या जुनियर नेमबाजांची कमाल

ISSF World Championships : भारताच्या जुनियर नेमबाजांची कमाल

सौजन्य - फ्री प्रेस जर्नल

साउथ कोरियाच्या चँगवून शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताच्या दिव्यांश सिंग आणि श्रेया अगरवाल या जुनियर नेमबाजांनी आपली कमाल दाखवत भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. मात्र भारताच्या सिनीयर नेमबाजांना कोणतेही पदक मिळवण्यात यश आलेले नाही.

दिव्यांश सिंग आणि श्रेया अगरवाल यांनी तब्बल ४२ संघांतून ८३४.४ गुण मिळवत पात्रता फेरी गाठली त्यानंतर दोघांनी मिळून ४३५ गुण मिळवत तिसरे स्थान आपल्या नावावर केले आहे. तर इटलीची जोडी सोफीया आणि मार्को यांनी सुवर्णपदक मिळवले असून इराणच्या अरमिना आणि मोहम्मद आमिर या जोडीने रौप्यपदक आपल्या नावे केले आहे. भारताची दुसरी जोडी एलवेनील आणि ह्रदय हजारीका यांनी ८२९ गुणांसह १३ वे स्थान मिळवले आहे.


आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या काल झालेल्या ५० मीटर पिस्तुल स्पर्धेत भारताच्या २३ वर्षीय ओम प्रकाश मिठारवालने ५६४ गुणांसह भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. ओमने सर्बियाच्या दामीर याला मागे टाकत सुवर्णपदक मिळवले असून दामीरच्या खात्यावर ५६२ गुण होते.

First Published on: September 5, 2018 3:00 PM
Exit mobile version