भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठेचा पुरस्कार

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठेचा पुरस्कार

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठेचा पुरस्कार

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी २०१८ – १९च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा केली आहे.

अशी केली बुमराहने कामगिरी

आयसीसीच्या वनडे क्रमवारीतील अव्वल गोलंदाज बुमराहने जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पदार्पण केले होते. त्याने आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, आणि वेस्ट इंडिज संघांविरुद्ध प्रत्येकी ५ विकेट घेण्याची कामगिरी केली होती. तसेच अशी कामगिरी करणारा बुमराह हा पहिला आणि एकमेव आशियाई गोलंदाज आहे. तर बीसीसीआयच्या माहितीनुसार; बुमराहने एक ऑक्टोबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या ६ कसोटी सामन्यांमध्ये ३४ विकेट घेतल्या. तर १७ वनडेत ३१ विकेट आणि ७ टी-२० सामन्यात ८ विकेट घेतल्या होत्या.

पुनम यादवला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार

ऑस्ट्रेलिया संघाचा त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभव करुन भारताने विजय मिळवला होता. या विजयात बुमराहचा मोठा वाटा होता. त्यामुळे बुमराहच्या कामगिरीमुळे पुरुषांच्या विभागात बुमराहला सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे तर महिला क्रिकेटपटूंमध्ये पुनम यादवने सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे. पुनमने १ ऑक्टोबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात ८ वनडेत १४, १५ टी-२० सामन्यात २० विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार के. श्रीकांत आणि अंजुन चोप्रा यांना कर्नल सी.के.नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.


हेही वाचा – सचिनला इतिहास घडवण्याची संधी


 

First Published on: January 12, 2020 1:13 PM
Exit mobile version