घरक्रीडासचिनला इतिहास घडवण्याची संधी

सचिनला इतिहास घडवण्याची संधी

Subscribe

8 क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी नामांकन

भारताचा महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च क्षणांमध्ये सचिनच्या एका फोटोचा समावेश झाला आहे. भारताने 2011मध्ये आयसीसी वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले होते.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत दुसर्‍यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. या विजेतेपदानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती. या क्षणाचा समावेश सर्वोत्कृष्ठ क्रीडा लॉरेन्स पुरस्काराच्या नामांकनामध्ये झाला आहे.

- Advertisement -

सचिन तेंडुलकरला सहकार्‍यांनी खांद्यावर घेतलेल्या क्षणाला ‘कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन’ असे शिर्षक देण्यात आले आहे. आजपासून 9 वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने त्याच्या सहाव्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच चषक उंचावला होता. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संघातील सहकार्‍यांनी सचिनला खांद्यावर घेत ‘लॅप ऑफ ऑनर’ दिला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2002मध्ये लॉरेन्स अकादमीचा पुरस्कार जिंकला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -