Jofra Archer : मी बुमराहचा तिरस्कार करतो, जोफ्रा आर्चरचे ट्विट व्हायरल

Jofra Archer : मी बुमराहचा तिरस्कार करतो, जोफ्रा आर्चरचे ट्विट व्हायरल

इंग्लंडचे खेळाडू हे नेहमीच आपल्या आक्रमक वक्तव्यातून विरोधी संघाविरोधात मोर्चेबांधणी करत असतात. इंग्लंडच्या जलदगती गोलंदाज असलेल्या जोफ्रा आर्चरही ट्विट करून आक्रमक विधाने करण्यात मागे नाही. आर्चरने आठ वर्षांपूर्वी केलेले ट्विट आजही व्हायरल होत आहे. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहविरोधात केलेल्या ट्विटची चर्चा आजही होत आहे. या ट्विटमध्ये आर्चरने बुमराहला टार्गेट केले होते. मी बुमराहचा तिरस्कार करतो असे हे ट्विट होते.

हे ट्विट २०१४ वर्षातील आहे, ज्यावेळी आर्चरने क्रिकेट विश्वात पदार्पणही केले नव्हते. पण यंदाच्या आयपीएल हंगामाच्या आधी झालेल्या लिलावात मात्र जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सच्या संघात जागा मिळाली आहे. याच संघातील हुकुमी एक्का असलेला बुमराह हा गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करतो. याच गोलंदाजीच्या युनिटमध्ये आता जोफ्रा आर्चरचाही समावेश झाला आहे. आठ वर्षापूर्वी करण्यात आलेल्या ट्विटमुळे या जोडीमध्ये नेमके काय घडणार याची उत्सुकता सर्वांना आहे. जोफ्रानेही मी आयपीएल पाहत असल्यापासून या संघाकडून खेळण्याचे माझे लक्ष्य होते असे ट्विट केले आहे.

 

यंदाच्या २०२२ च्या आयपीएल हंगामात जोफ्रा आर्चर खेळणार नसल्याचे त्याने आधीच सांगितले आहे. त्यामुळे बुमराह आर्चर जोडीचा मुंबई इंडियन्ससाठीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी MI पलटनच्या चाहत्यांना २०२३ च्या आयपीएल हंगामाची वाट पहावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावाच्या प्रक्रियेत दुसऱ्या दिवशी मुंबई इंडियन्स जोफ्रा आर्चरसाठी अचानकपणे अॅक्टीव्ह झालेली दिसली. या बोली प्रक्रियेत तब्बल ८ कोटी रूपयांची बोली मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरवर लावली. सन रायझर्स हैद्राबादनेही ७ कोटी रूपयांची बोली या लिलाव प्रक्रियेत लावली.

राजस्थान रॉयल्सचा संचालक आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा या लिलाव प्रक्रियेतील व्हिडिओही या निमित्ताने बोलका आहे. संगकाराने सर्वाधिक बोली लावावी यासाठी इतर संघांना इशाराही दिला. पण हैद्राबाद आणि मुंबईतील स्पर्धेत अखेर मुंबई इंडियन्सने ८ कोटींना जोफ्रा आर्चरला आपल्या संघासाठी निवडले. मुंबई इंडियन्सच्या महेला जयवर्धनेच्या आग्रहावरूनच जोफ्रा आणि बुमराह या जोडीची निवड मुंबई इंडियन्ससाठी करण्यात आल्याचे स्पष्टीकरण मुंबई इंडियन फ्रॅंचायसीचा मालक आकाश अंबानीने दिले आहे. गोलंदाजीच्या युनिटमध्ये जोफ्रा आणि आर्चरची जोडी ही चांगली कामगिरी करेल यासाठी आम्ही उत्सुक असल्याचेही आकाश अंबानीने स्पष्ट केले आहे.

 


 

First Published on: February 17, 2022 8:19 AM
Exit mobile version