विम्बल्डन २०१८ : स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर उपांत्यपूर्वफेरीतून बाहेर

विम्बल्डन २०१८ : स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर उपांत्यपूर्वफेरीतून बाहेर

रॉजर फेडरर

लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सर्वच टेनिस फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. टेनिसमधील सम्राट मानला जाणाऱ्या रॉजर फेडररचा उपांत्यपूर्वफेरीत केविन अँडरसनने पराभव केला आहे आणि रॉजररला स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. तर रॉजरवर मिळवलेल्या अप्रतिम विजयामुळे केविनने उपांत्यफेरीत गाठली आहे.

सामन्याच्या सुरूवातीला रॉजररने आपली जादू दाखवत पहिले दोन सेट्स जिंकले. त्याने हे सेट्स ६-२ आणि ७-६ च्या फरकाने जिकले, मात्र त्यानंतर केविनने सामन्यात आक्रमक खेळ करत शेवटचे तिन्ही सेट जिंकत सामन्यात विजय मिळवला. केविनने फेडररवर शेवटच्या तीन सेटमध्ये ५-७,४-६ आणि ११-१३ च्या फरकाने विजय मिळवला.

केविन अँडरसन

सामन्याचे सुरूवातीच्या दोन सेट्समध्ये विजय मिळवल्याने रॉजररला सामन्यात विजय मिळवण्याचा मौका आला होता खरा मात्र तिसऱ्या सेटपासून अँडरसनने अप्रतिम खेळ करत रॉजरकडून विजय हिरावून घेतला. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर आणि दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनमध्ये चाललेला हा चुरशीचा सामना जवळपास चार तास चालला.

रॉजर फेडररने याआधी २० ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. मात्र यावर्षी त्याला उपांत्यपूर्वफेरीतून बाहेर जावे लागल्यामुळे त्याचे यावर्षीचे विजयाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. सध्या राफेल नादाल आणि नोवाक जोकोविच दोघेही अप्रतिम आहेत. त्यामुळे यावर्षीच्या विजयावर त्यांच्यापैकी कोण नाव कोरणार की नवीन विजेता जगासमोर येणार अशी उस्तुकता सर्वांना लागून राहीली आहे.

विजयानंतर केविन भावूक

दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने उपांत्यपूर्वफेरीत रॉजर फेडररला पराभूत करून, उपांत्यफेरीत झेप घेतली आहे. रॉजर सारख्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पराभव केल्यानंतर केविन थोडा भावूक झाल्याचे त्याच्या ट्विटवरून दिसून आले.

First Published on: July 12, 2018 1:46 PM
Exit mobile version