धोनी दिसणार आता समालोचकाच्या भूमिकेत?

धोनी दिसणार आता समालोचकाच्या भूमिकेत?

म्हणून २००८ साली धोनीने कर्णधार पद सोडण्याची दिली होती धमकी!

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा धोनी अजून एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झालेला नाही. मात्र, तो लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसू शकेल. भारतीय संघ आपला पहिलावहिला डे-नाईट कसोटी सामना २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळणार आहे. या सामन्यात धोनी समालोचकाच्या (कॉमेंटेटर) भूमिकेत दिसू शकेल. या मालिकेचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) यासाठी परवानगी मागितली आहे.

हेही वाचा – आयपीएलमध्ये आता पॉवर प्लेयर?

…तर धोनी समालोचन करताना दिसेल

‘प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीने आमच्यासमोर प्रस्ताव ठेवला आहे, पण अजून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. बीसीसीआयने परवानगी दिली, तर ईडन गार्डन्स येथे होणाऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यात धोनी समालोचन करताना दिसू शकेल’, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. भारत आणि बांग्लादेश या संघांमध्ये सध्या टी-२० मालिका सुरु असून या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने जिंकला. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (७ नोव्हेंबर) आणि तिसरा सामना रविवारी (१० नोव्हेंबर) होणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

First Published on: November 6, 2019 5:35 PM
Exit mobile version