Asian Games 2018 : भारतीय महिला बॅडमिंटन संघ पराभूत

Asian Games 2018 : भारतीय महिला बॅडमिंटन संघ पराभूत

आशियाई खेळ २०१८

एशियाड गेम्स २०१८ मध्ये भारतीय महिला बॅडमिंटन संघाला केवळ एका विजयाच्या अभावामुळे जपानविरूद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. जपानने भारताला ३-१ च्या फरकाने नमवत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश मिळवला आहे.

वाचा – Asian Games 2018 : पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

असा मिळवला जपानने विजय

जपान आणि भारत यांच्यातील सामन्यात भारताची सुवर्णकन्या सिंधूने चांगली सुरूवात करत जपानच्या अकाने यामागुचीवर २१-१८, २१-१९ च्या फरकाने विजय मिळवला मात्र त्यानंतर सायनाला एकेरी सामन्यात जपानच्या नोझुमी ओकुहाराने २१-११, २३-२५, २१-१६ च्या फरकाने नमवले. तर दुसरीकडे दुहेरीत सामन्यात सारा सुनील आणि एन सिक्की रेड्डी यांना जपानच्या सयाका हिरोटा आणि युकी फुकुशिमा यांनी २१-१५, २१-६ च्या फरकाने नमवत विजय मिळवला. त्याचसोबत दुसऱ्या दुहेरी सामन्यात सिंधू आणि अश्विनी पोनप्पा यांना मिसाकी मात्सुटोमो आणि अयाका ताकाहाशी या जोडीने पराभूत करत भारतीय बॅडमिंटन महिला संघांला पराभूत करत उपात्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.


 वाचा – Asian Games 2018 : सलामीच्या सामन्यात सायना पराभूत

First Published on: August 20, 2018 12:03 PM
Exit mobile version