मरून किकबॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंचे यश

मरून किकबॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंचे यश

द मरून किक बॉक्सिंग अकॅडमी च्या १३ खेळाडूंनी मुंबई उपनगर जिल्हा चॅम्पियन शिप २०२१ च्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत २६ पदकांची कमाई केली आहे. खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले खेळाडू व प्रशिक्षण श्री.गणेश यादव यांचे मार्गदर्शन लाभले. सदर स्पर्धा श्री.प्रशांत मोहिते व श्री सुरेश खंदारे यांनी यशस्वीरीत्या आयोजित केल्या होत्या.

या स्पर्धा १० ते १७ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झाल्या. सर्व विजेते स्पर्धक गोरेगाव व मालाड या भागातील रहिवासी आहेत. या १३ स्पर्धकांनी पॉईंट फाईट व लाईट कॉन्टॅक्ट फाईट या क्रीडा प्रकारात एकूण १२ सुवर्ण, ७ रौप्य व ७ कांस्य पदकांची कमाई केली. सर्व विजेत्या खेळाडूंनी सपोर्ट स्टाफ श्री.रोहित मिश्रा यांनी स्पर्धेची तयारी व प्रत्यक्ष स्पर्धेवेळी दिलेल्या प्रोत्साहन आणि प्रेरणा याकरता ऋण व्यक्त केले.

यावेळी बोलताना प्रशिक्षक गणेश यादव म्हणाले, “आमच्या टीमने या स्पर्धेत धाडस, समर्पण व खिलाडूवृत्ती यांचे दर्शन घडविले. सर्व विजेते खेळाडू हे विद्यार्थी व पूर्णवेळ नोकरी करणारे आहेत, यातून हे स्पष्ट होते की खेळात यशस्वी होण्यासाठी पूर्णवेळ खेळाडू असण्याची आवश्यकता नाही. लोकांनी खेळाकडे फक्त खेळ म्हणून न पाहता एक जीवन पध्दती म्हणून पाहिले पाहिजे.

विजेत्या खेळाडूंची नावे

सुवर्णपदक– देमिरा नंदू, जगजीतकौर मानकू , मेहुल महेश्वरी, प्रशांत सोनी, ईशान शहा, विनायक उरडी, संकेत मिश्रा, लतीकेश गावनकर, कोमल बने,

रौप्यपदक– सायली पाटील, नम्रता सोनी, मेहुल महेश्वरी, प्रशांत सोनी, अंशुल वर्मा, ईशान शाह, अनिस जोशी

कांस्यपदक– सायली पाटील, नम्रता सोनी, जगजीत कौर मानकू , अंशुल वर्मा, अनिस जोशी, लातीकेश गवाणकर, कोमल बणे

First Published on: October 20, 2021 1:18 PM
Exit mobile version