बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन, क्रिकेटपटूंवर १ वर्षांची बंदी ३८ लाखांचा दंड

बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन, क्रिकेटपटूंवर १ वर्षांची बंदी ३८ लाखांचा दंड

बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन, क्रिकेटपटूंवर १ वर्षांची बंदी ३८ लाखांचा दंड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटूंना बायो बबलची निर्मिती करण्यात आली आहे. जैव सुरक्षा वातावरण म्हणजे बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन करणं क्रिकेटपटूंना चांगलच भोवलं आहे. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी इंग्लंड दौऱ्यादरम्यान जैव सुरक्षा वातावरणाच्या नियमांचे उल्लंघन केलं. या क्रिकेटपटूंवर कारवाई करण्यासाठी ५ सदस्यीय समिती नेमण्यात आली होती या समितीच्या अहवालानुसार या क्रिकेटपटूंवर १ वर्षांची बंदी आणि १० मिलियन श्रीलंकन रुपये म्हणजेच भारतातील ३८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंचे कोरोनापासून संरक्षण करण्यसाठी काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. खेळाडूंना या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. परंतू या नियमांचे उल्लंघन करणं क्रिकेटपटूंना महागात पडलं आहे. बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी श्रीलंकेचे खेळाडू फलंदाज धनुष्का गुणतिलका, कुसाल मेंडिस आणि विकेटकीपर निरोशन डिकवेला यांच्याविरोधात कारवाई करत १ वर्षांची बंदी आणि ३८ लाख भारतीय रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

समितीच्या अहवालानंतर कारवाई 

बायो बबलचे नियम मोडल्यामुळे या खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे. खेळाडूंवर योग्य कारवाई करण्यासाठी ५ सदस्यी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार खेळाडूंवर १८ महिन्यांची बंदी आणि २५ हजार डॉलर इतका दंड आकारण्या सांगितले होते. परंतू त्यांच्यावर १ वर्षांची बंदी आणि १० मिलियन श्रीलंकन रुपयांचा दंड आकारला आहे.

श्रीलंकेच्या या तीन खेळाडूंनी जून महिन्यात इग्लंड दौरा केला होता या दौऱ्यातील तिसऱ्या वनडेच्या मालिकेपुर्वी बायो बबलचे नियम मोडले. खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांना तात्काळ परतण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांच्याविरोधात कारवाई सुरु केली. न्यायधिशाच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली असून या समितीने तिघांना दोषी ठरवले आहे. बायो बबलचे नियम मोडल्यामुळे या खेळाडूंनी भारता विरुद्धच्या टी-२० आणि मालिकेसाठी फेरविचार करण्यात आला नाही.

खेळाडूंवर आरोप

जैव सुरक्षा वातावरण म्हणजेच बायो बबल वातावणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच कोरोना नियमांवकडे दुर्लक्ष करुन दुसऱ्या खेळाडूंना धोका निर्माण करणे, रात्री उशीरा पर्यंत हॉटेल रुममध्ये न परत येणे, देशाचे तसेच क्रिकेट बोर्डाचे नाव बदनाम करणे असे आरोपा या खेळाडूंवर करण्यात आले आहेत.

First Published on: July 31, 2021 12:13 PM
Exit mobile version