MI vs KKR: मुंबईने विजयाचं खातं उघडलं; वेगवान माऱ्यापुढे KKR चा डाव गडगडला

MI vs KKR: मुंबईने विजयाचं खातं उघडलं; वेगवान माऱ्यापुढे KKR चा डाव गडगडला

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १३ व्या मोसमातील विजयाचं खातं उघडलं आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि सुर्याकुमार यादवच्या तडाकेबाज खेळीमुळे मुंबईने केकेआरसमोर १९६ धावांचं लक्ष्य ठेवता आलं. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. मुंबईच्या वेगवान माऱ्यापुढे KKR चा डाव गडगडला. १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला केवळ १४६ धावाच करता आल्या.

रोहित शर्माच्या तडाखेबाज ८० धावांच्या खेळीमुळे आणि मुंबईच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांना कोलकातावर ४९ धावांनी विजय मिळवता आला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला. रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २० षटकांत ५ गडी गमावून १९५ धावा केल्या. त्याला उत्तर म्हणून कोलकाताने ९ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १४६ धावा केल्या आणि हा सामना ४९ धावांनी गमावला.

 

First Published on: September 23, 2020 11:49 PM
Exit mobile version