IPL 2022 : RCB ने डुप्लेसीला का दिली विराट कोहलीची जागा ?, फ्रॅंचायझी डायरेक्टरने केला खुलासा

IPL 2022 : RCB ने डुप्लेसीला का दिली विराट कोहलीची जागा ?, फ्रॅंचायझी डायरेक्टरने केला खुलासा

IPL 2022 : RCB ने डुप्लेसीला का दिली विराट कोहलीची जागा ?, फ्रॅंचायझी डायरेक्टरने केला खुलासा

स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने आयपीएल २०२१ नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची घोषषा केली. यानंतर संघात उत्तराधिकारी कोण याबाबत शोध सुरु होता. अनेक चर्चांनंतर संघाकडून नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल हंगाम २०२२ साठी फाप डुप्लेसीला संघाच कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. डुप्लेसीला संघाचा कर्णधार का करण्यात आले? याबाबतचे स्पष्टीकरण फ्रेंचायझीचे निर्देशक माइक हसन यांनी दिले आहे.

मागील महिन्यात आयपीएल मेगा लिलावात डुप्लेसी रॉय चॅलेंजर्स बंगळूरु संघासोबत जोडल्यानंतर कर्णधारपदासाठी सर्वात मजबूत खेळाडू ठरला आहे. यापूर्वी ग्लेन मॅक्सवेलकडे संघाची कमान सोपवण्यात येईल अशी चर्चा होती ज्याला आरसीबीने रिटेन केले आहे. तसेच दिनेश कार्तिकसुद्धा कर्णधारपदाची भूमिका बजावेल असे सांगण्यात येत होते. कार्तिकला फ्रेंचायझीने ५.५ करोड रुपयांमध्ये संघात घेतले आहे.

म्हणून डुप्लेसीला कर्णधार करण्यात आले

माइक हसन यांनी डुप्लेसीचे समर्थन करुन म्हटलं आहे की, तो एक चांगला खेळाडू आहे. जेव्हा तुम्ही ठरवता की, कर्णधार म्हणून कोण जास्त उपयुक्त उमेदवार आहे. तेव्हा तुम्ही तो खेळाडू भारतीय असो किंवा विदेशी आहे असा विचार करत नाही.

डुप्लेसीला संघाचा कर्णधार करणार अशा विचाराने लिलावात खरेदी करण्यात आले का? असा प्रश्न माइक हसन यांना केला होता. यावर ते म्हणाले की, आमच्याकडे मॅक्सवेल आणि विराटकडे नेतृत्वाचा चांगला अनुभव आहे. आमच्या नेतृत्वांना वाटत होते की संघामध्ये विस्तार केला पाहिजे. हर्षल पटलेलला सुद्धा संघात पुन्हा घ्यायचे होते. ते आमच्या नेतृत्वाला पुढे नेण्यासाठी ठरवण्यात आले होते. फाफ डुप्लेसी आमच्या खेळाडूंच्या यादीत सर्वात वरती होते. मला माहिती आहे की, ते किती चतुर आणि सन्मानित आहेत. तसेच ते विराट कोहलीची आवड आहेत. माइक हसनच्या नुसार संघात विराट, मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकसारखे खेळाडू आहेत.


हेही वाचा : IPL 2022: आयपीएलच्या १० संघातील कर्णधारांची घोषणा, दोन परदेशी खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची कमान

First Published on: March 13, 2022 4:42 PM
Exit mobile version