IND vs AUS : वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल मोहम्मद सिराजचे कौतुक – लायन

IND vs AUS : वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल मोहम्मद सिराजचे कौतुक – लायन

मोहम्मद सिराज

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर काही चाहत्यांनी वर्णभेदी टीका झाली होती. भारतीय संघाने याबाबत सामनाधिकारी डेविड बून यांच्याकडे तक्रार केली. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा या चाहत्यांनी सिराजवर वर्णभेदी टीका केली आणि हे सिराजने त्वरित पंचांना सांगितले. त्यानंतर या चाहत्यांना मैदानातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवण्याबद्दल सिराजचे कौतुक झाले पाहिजे, असे मत ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नेथन लायनने व्यक्त केले.

सिराजसोबत जे झाले, ते निंदनीय होते. त्याने वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवला याबद्दल त्याचे कौतुक झाले पाहिजे. त्याने इतर खेळाडूंसमोर उदाहरण ठेवले आहे. वर्णभेद किंवा शिवीगाळ याला खेळात जराही स्थान नाही. काही चाहते खेळाडूंना चिडवतात. त्यांना आपण गंमत करत आहोत असे वाटते. मात्र, याचा खेळाडूंवर काय परिणाम होतो याचा हे चाहते विचार करत नाहीत, असे लायन म्हणाला.

First Published on: January 13, 2021 9:43 PM
Exit mobile version