Video: भारतीय संघाचा माजी कर्णधार बनला शेतकरी

Video: भारतीय संघाचा माजी कर्णधार बनला शेतकरी

Video: भारतीय संघाचा माजी कर्णधार बनला शेतकरी

आयसीसी विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव झाल्यापासून महेंद्रसिंग धोनी कोणत्याही सामन्यात खेळलेला नाही. त्यानंतर धोनीला बीसीसीआयच्या करार यादीतून वगळण्यात आले. आता धोनी २९ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून क्रिकेट मैदानावर पुन्हा उतरताना दिसणार आहे. सध्या धोनीचा आयपीएल सुरू होण्यापूर्वीच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो सेंद्रिय शेती तसंच पपई आणि कलिंगडची शेती करण्यासाठी शिकत आहे. यापूर्वी देखील धोनीचा माजी क्रिकेटर आरपी सिंग आणि पीयूष चावलाला पाणीपूरी खायला घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आता शेती करतानाचा व्हिडिओ महेंद्रसिंग धोनीने फेसबुक शेअर केला आहे. या व्हिडिओत शेती करण्यापूर्वी धोनी पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना धोनीने असं लिहिलं की, ‘रांचीमध्ये २० दिवसांत सेंद्रिय पपई आणि कलिंगडची शेती करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदा मी इतका उत्साही आहे.’

आयपीएल २०२० ची सुरुवात येत्या २९ मार्चपासून होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघात पहिला सामना रंगणार आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएश विश्वनाथन म्हणाले की, धोनी इतर खेळांडूसोबत प्रशिक्षण घेणार आहे. तर संघाची तयारी १९ मार्चपासून सुरू होणार आहे. सुत्राच्या माहितीनुसार, धोनी सुरेश रैना आणि अंबती रायडूसोबत दोन आठवड सरावर करणार आहे.


हेही वाचा – टेनिस मी तुझा निरोप घेत आहे, मारिया शारापोवाची आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती


 

First Published on: February 27, 2020 10:09 AM
Exit mobile version