धोनी आयपीएलमधून होणार निवृत्त?, FB Liveच्या माध्यमातून करणार मोठी घोषणा

धोनी आयपीएलमधून होणार निवृत्त?, FB Liveच्या माध्यमातून करणार मोठी घोषणा

महेंद्रसिंग धोनी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. धोनी आयसीसीच्या तिन्ही मानाच्या ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. परंतु उद्या 25 सप्टेंबर रोजी FB Liveच्या माध्यमातून धोनी एक महत्त्वपूर्ण घोषणा करणार आहे. धोनी नेमकं काय बोलणार आणि कोणती घोषणा करणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे धोनीची पोस्ट?

मी तुमच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता लाईव्ह येऊन मी ती माहिती देणार आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्व FB Liveवर उपस्थित रहाल, असं एमएस धोनीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.

एमएस धोनीने दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होतं. 2019 मध्ये विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारत पराभूत झाला, ज्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय सामना खेळलाच नाही. भारतात IPL 2021 च्या पहिल्या टप्प्यात चेन्नईमध्ये CSK चा एकही सामना खेळला गेला नाही.

धोनी IPL 2023 मध्ये शेवटच्या वेळी मैदानात उतरेल, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं नेतृत्त्व करत आहे. त्याला आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहते मोठी गर्दी करतात. परंतु धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार ? की दुसरी कोणती मोठी घोषणा करणार हे पाहणं चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केलं आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत.


हेही वाचा : विराटच्या एका इशाऱ्यानं चाहत्यांना केलं गप्प, सामन्यादरम्यानचा व्हिडीओ


 

First Published on: September 24, 2022 10:14 PM
Exit mobile version