विराट कोहलीला दिव्यांची सलामी

विराट कोहलीला दिव्यांची सलामी

नवी मुंबई येथील मॉलमध्ये विराट कोहलीची बनवलेली प्रतिकृती

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नेहेमीच आपल्या फॅन्समध्ये चर्चेत असतो. विराट कोहली सध्या केरळ येथे असला तरी त्याचे फॅन्सत्याला सलामी देण्याची एकही संधी सोडत नाही. विराटचे चित्र असो किंवा विराटची जर्सी असो अशा विविध माध्यमातून फॅन्स त्याला सलामी देतच असताच. दिव्यांचा उत्सव दिवळी आता काही लांब राहिला नाही. लवकरच दिवळी सणाची सुरूवात होणार आहे. या निमित्ताने विराटच्या फॅन्सने मुंबईतील एका मॉलमध्ये त्याची दिव्याने प्रतिकृती पारंपरिक दिव्याची प्रतिकृती तयार करण्यात आली. या प्रतिकृतीला बघण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली आहे. लोकांना ही प्रतिकृती फार आवडली असून याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह लोकांना आवरत नाही.

नवी मुंबईतील मॉलमध्ये काढण्यात आली प्रतिकृती

विराट सध्या वेस्टइंडिजबरोबर एकदिवसीय मालिका सामना खेळत आहे. या सामन्यांमध्ये त्याने दहा हजार धावा पूर्ण केल्या. या धावा पूर्ण करणारा विराट हा एकमेव खेळाडू आहे. यासाठी त्याच्या फॅन्समध्ये आनंदाची लाट उसळली होती. सर्व ठिकाणाहून त्याचे कौतूक करण्यात आले. सोशल मीडियावर त्यावर कौतूकाचा पाऊस पडला. सर्व फॅन्स त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी धावत होते. मात्र त्याच्या मुंबईतील एका फॅन ने काही वेगळा विचार केला. त्याने येथील एका मॉलमध्ये दिव्याची प्रतिकृती साकारली. ही प्रतिकृती ९.५ फूट रूंद आणि १४ फूट उंच आहे. ही तयार करताना ४ हजार ४८४ दिव्यांचा वापर केला गेला.

‘विराट कोहली आज एक चमकता तारा आहे. दिवळीच्या शुभमुहूर्तावर त्याच्यासाठी दिव्यांची रांगोळी बनवून मला खूप समाधान मिळाले. याहून अधिक चांगली सलामी असू शकणार नाही. याचबरोबर ५ नोव्हेंबर रोजी विराटचा वाढदिवस आहे. यावर्षी त्याचा वाढदिवस आणि दिवाळी एका वेळेस आली. म्हणून आमच्याकडून हे वाढदिवसाचे गीफ्ट आहे.’ – आबासाहेब शेवाळे, दिव्यांची प्रतिकृती साकारणारे

First Published on: November 1, 2018 4:26 PM
Exit mobile version