श्री समर्थ-अमर हिंद आमनेसामने

श्री समर्थ-अमर हिंद आमनेसामने

अमर हिंद मंडळ आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर या मुलींच्या संघांनी लायन्स क्लब ऑफ माहीम आणि मुंबई खो-खो संघटनेने संयुक्तपणे आयोजित केलेल्या सब-ज्युनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत श्री समर्थ व्यायाम मंदिर संघाने गतविजेत्या ओम साईश्वर सेवा मंडळाला पराभवाचा धक्का दिला.

मुलींच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने ओम साईश्वरला १५-४ असे पराभूत केले. मधुरा मालप (३:२०, २:४० मिनिटे संरक्षण आणि ८ बळी), प्रणाली मेंढी (२:२०, ३:१० मिनिटे संरक्षण आणि १ बळी) या खेळाडू श्री समर्थकडून चांगल्या खेळल्या. दुसर्‍या सामन्यात अमर हिंदने सरस्वती मंदिरवर १५-१३ अशी मात केली. रुद्र नाटेकर (२:०० मिनिटे संरक्षण आणि ६ बळी), किंजल भिकुले (२:२० मिनिटे संरक्षण आणि २ बळी) यांनी अमर हिंदच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

विद्यार्थी क्रीडा केंद्र फायनलमध्ये

विद्यार्थी क्रीडा केंद्र आणि युवक क्रीडा मंडळ या मुलांच्या संघांनी सब-ज्युनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत विद्यार्थी क्रीडा केंद्राने ओम समर्थ व्यायाम मंदिरचा ११-८ (५-२) असा जादा डावात ३ गुणांनी पराभव केला. तर युवक क्रीडा मंडळाने अमर हिंद मंडळावर ११-८ अशी एक डाव आणि ३ गुणांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

First Published on: February 27, 2020 5:28 AM
Exit mobile version