IPL मधील मुंबईचा संघ नव्या प्रवास वाटेवर; आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळणार

IPL मधील मुंबईचा संघ नव्या प्रवास वाटेवर; आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळणार

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) पाच वेळा जेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्स संघ नव्या लीगमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईचा संघ आता आयपीएलपुरताच मर्यादीत न राहाता, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणार आहे. मुंबई इंडियन्सने आंतरराष्ट्रीय स्तरावरही 2 नवे संघ लीगमध्ये खेळवण्यासाठी उतरवले आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या SA T20 लीग आणि UAE च्या T20 लीगसाठी MI केप टाउन आणि MI Emirates या नावाने संघ तयार करण्यात आले आहेत. हे दोन्ही संघ लीगमध्ये खेळण्यासाठी उतरणार आहेत असून, UAE च्या संघासाठी प्रशिक्षक कोणकोण असणार आहेत त्यांची नाव जाहीर करण्यात आली आहेत.

शेन बॉन्ड यांच्याकडे मुंबई इंडियन्स Emirates संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदी निवड करण्यात आल्याचे समजते आहे. लवकरच संघ देखील जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेले आणि आता खेळणाऱ्या खेळाडूंचाही समावेश करण्यात येणार असल्याचे समजते. यामध्ये कोणाला टीममध्ये संधी दिली जाणार याची उत्सुकता देखील असणार आहे.

पार्थिव पटेल, विनय कुमार यांच्यावरही मोठी जबाबदारी मुंबई इंडियन्सकडून सोपवण्यात आली आहे. पार्थिव पटेल बॅटिंग कोच असतील. तर विनय कुमार बॉलिंग कोच असणार आहेत. जेम्स फ्रॅक्लीन हे फिल्डिंग कोच म्हणून महत्त्वाची जबाबदारी निभावणार आहेत.

मुंबई इंडियन्सने दिग्गज यष्टीरक्षक, फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख प्रशिक्षक मार्क बाऊचर याच्याकडे मुंबई इंडियन्स संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मार्क बाऊचर मुंबई इंडियन्स संघाच्या प्रमुख प्रशिक्षक असलेल्या श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला रिप्लेस करणार आहे.

5 वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या दोन हंगामात 2021 आणि 2022 मध्ये प्लेऑफमध्ये जागा मिळवू शकला नव्हता. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला 14 सामन्यांमध्ये केवळ 4 सामनेच जिंकता आले होते. तर 10 सामन्यांत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ शेवटच्या नंबरवर राहिला होता.


हेही वाचा – टी-20 मालिकेत विराटला दोन रेकॉर्ड करण्याची संधी, द्रविडचाही विक्रम मोडणार?

First Published on: September 17, 2022 2:45 PM
Exit mobile version