India Open Badminton 2022 : मोठी कामगिरी ! सायना नेहवालचा महाराष्ट्राच्या मालविकाने केला पराभव

India Open Badminton 2022 : मोठी कामगिरी ! सायना नेहवालचा महाराष्ट्राच्या मालविकाने केला पराभव

इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या २० वर्षीय मालविका  ने सायना नेहवालचा पराभव केला आहे. मालविका बनसोडने बॅडमिंटन विश्वास मोठी कामगिरी केली आहे. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता सायना नेहवालला स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मालविकाने हरवलं आहे. त्यानंतर दिग्गज खेळाडूला हरवल्यामुळे सोशल मीडियावरून मालविकाचे कौतुक केले जात आहे. ३४ मिनिटांपर्यंत सुरू असलेल्या सामन्यात मालविकाने २१-१७,२१-९ ने सायनाला पराभूत केलंय. जागतिक क्रमवारीत सायना २५ व्या क्रमांकावर आहे. तर मालविका १११ व्या क्रमांकावर आहे.

पहिल्या खेळाच्या सुरूवातीला ४-४ अशी बरोबरी

सायना आणि मालविका या दोन्ही बॅडमिनंटपटूंनी पहिल्या खेळाच्या सुरूवातीला बरोबरी साधली होती. दोन्ही खेळाडू ४-४ असे बरोबरीत होत्या. परंतु मालविकाने तिचा पराभव करत आघाडी मिळवली आहे. तसेच खेळाचा वेग सुद्दा तिनं आता वाढवला आहे.

सायनाचा वर्षातील पहिल्या बॅडमिंटन स्पर्धेतील प्रवास दुसऱ्या फेरीतच थांबला आहे. सायनाने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेद्वारे प्रदीर्घ कालावधीनंतर बॅडमिंटन कोर्टावर प्रवेश केला होता. परंतु नवीन वर्षाची सुरूवात तिच्यासाठी चांगली ठरलेली नाहीये. दुसरीकडे भारताची स्टार शटलर पी.व्ही. सिंधूनेही विजयासह पुढील फेरीत प्रवेश केला आहे. तिने इरा शर्माविरुद्धचा दुसऱ्या फेरीचा सामना २१-१०, २१-१० असा जिंकला आहे.

महाराष्ट्राच्या मालविकाची मोठी कामगिरी

बॅडमिनंटपटूं मालविका बनसोड महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट आणि प्रतिभावान खेळाडू आहे. १३ आणि १७ वर्षांखालील स्तरावरील मालविकाने अनेक राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या आहे. २०१८ मध्ये मालविकाची जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. तर काठमांडू येथील दक्षिण आशियाई बॅडमिंटन स्पर्धेसाठी तिने विजेतेपद पटकावले होते. तसेच जागतिक क्रमवारीत मालविका १११ व्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा : अजितदादांना नारायण राणेंचे चोख प्रत्युत्तर, म्हणाले अकलेचे धडे…


 

First Published on: January 13, 2022 5:44 PM
Exit mobile version