Ind vs Pak 2021 : पाकच्या प्रशिक्षकाची उडाली झोप, दोन भारतीय खेळाडूंचा पाकला धोका…

Ind vs Pak 2021 : पाकच्या प्रशिक्षकाची उडाली झोप, दोन भारतीय खेळाडूंचा पाकला धोका…
भारत आणि पाकिस्तान संघातील सामना हा सुपर सामना म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या सामन्यापेक्षा दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींच्या भावना या सामन्याशी जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळेच अतितटीचा सामना म्हणून यंदाचाही सामना पाहिला जात आहे. येत्या रविवारी टी २० विश्व चषकामध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना होत आहे. पण या सामन्याच्या आधीच पाकिस्तानच्या कोचची झोप उडाली आहे.  ऑस्ट्रेलिया संघाचे माजी क्रिकेटपट्टू आणि वर्तमान पाकिस्तानी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी २ भारतीय फलंदाजापासून पाकिस्तानच्या संघाला धोका असल्याचे सांगितले आहे.
भारतीय संघाचा विश्वकपातील पहिला सामना पाकिस्तान विरूध्द होणार आहे. अशातच भारतीय संघाने आपले दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. त्यामुळे साहजिकच भारतीय संघाचे मनोबल वाढले आहे. २४ ऑक्टोबरला भारताचा पाकिस्तान विरूध्द सामना आहे. ह्या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अशातच प्रेक्षकांसोबतच दोन्ही संघातील खेळाडूंची, आणि विशेषत: प्रशिक्षकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अशातच पाकिस्तान क्रिेकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी भारतीय संघाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ” मी भारतीय क्रिकेटला खूप जवळून ओळखून आहे. के.एल.राहुलला मेहनत करताना स्वत: पाहिले आहे. त्यामुळे तो पाकिस्तानसाठी मोठा धोका आहे, मी त्याचा संघर्षही पाहिला आहे. तो टी ट्वेंटी फॉरमॅटमध्ये वर्चस्व देखील गाजवत आहे. मी ऋषभ पंतलाही पाहिले आहे, तो आक्रमक गोलंदाजीचा शांतपणे सामना करू शकतो. त्याला संधी मिळाली की, तो त्याचे सामर्थ्य दाखवायला यशस्वी होतो.

के.एल.राहुल 

भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर येणाऱ्या टी २० विश्व चषकासाठी चांगलाच फॉर्ममध्ये असल्याचे पहायला मिळत आहे. दोन्ही सराव सामन्यातील त्याची कामगिरी अत्यंत प्रभावशील होती. के.एल.राहुल त्याच्या लयामुळे आक्रमक खेळी खेळत आहे. त्याने आयपीएल २०२१ मध्ये ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

First Published on: October 23, 2021 12:36 PM
Exit mobile version