विश्वचषकाच्या सामन्यांबाबत पाकिस्तानने मांडली भूमिका, पर्याय सूचवत BCCIवर साधला निशाणा

विश्वचषकाच्या सामन्यांबाबत पाकिस्तानने मांडली भूमिका, पर्याय सूचवत BCCIवर साधला निशाणा

आशिया चषकाच्या यजमानपदावरून बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद सुरू आहेत. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार, आशिया चषक २०२३ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले आहे. पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी आम्ही भारतात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विश्वचषकाच्या सामन्यांबाबत पाकिस्तानने आपली भूमिका मांडत आणि पर्याय सूचवत बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.

आम्ही सुद्धा यायाच विचार करत आहोत. जर बीसीसीआयने आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानात पाठवला नाहीतर भारतात होणाऱ्या विश्वचषकातील आमचे सामने बांगलादेश किंवा श्रीलंकेमध्ये व्हायला पाहिजेत. कारण आम्हाला भारतात सामने खेळायचे नाहीयेत, अशा शब्दांत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला लक्ष्य केले.

भारतीय संघ जर पाकिस्तानात खेळला नाहीतर आम्ही देखील भारतात खेळणार नाही. भारत-पाकिस्तान यांचे सामने कुठे व्हावेत याबाबत मार्ग काढायला हवा. पाकिस्तान सुपर लीगमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मजबूत झाले आहे. आम्ही आमच्या पायावर उभे राहिलो असून भारतीय संघ पाकिस्तानात नाही आला तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे महाव्यवस्थापक वसीम खान यांनीही मोठे विधान केले आहे. मला माहित नाही की भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने इतर तटस्थ ठिकाणी खेळवले जातील की नाही, परंतु मला वाटत नाही की, पाकिस्तान त्यांचे सामने भारतात खेळेल, असं वसीम खान म्हणाले.


हेही वाचा : IPL 2023 : काय आहे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम? यंदाच्या आयपीएलमध्ये मोठे बदल, जाणून


 

First Published on: March 30, 2023 6:01 PM
Exit mobile version