Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच पिता-पुत्र एकाच संघाकडून खेळणार; जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू

Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच पिता-पुत्र एकाच संघाकडून खेळणार; जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात देखील दिल्लीचा संघ कमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. अनुभवी जोगिंदर नरवालच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात त्याचा मुलगाही दिल्लीसाठी त्याची क्षमता दाखवण्यासाठी तयार झाला आहे. दरम्यान, प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात पहिल्यादांच एखादा खेळाडू त्याच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली त्याच संघाकडून खेळणार आहे. गेल्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचलेल्या दिल्लीचा संघ यावेळी जेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरेल. तर जोगिंदर आपल्या संघाला खेळाडूपेक्षा एक कर्णधार म्हणून अधिक उपयुक्त ठरेल. याआधीही त्याने अनेक लीगमध्ये शानदार कर्णधारपद भूषवले आहे.

जोगिंदर नरवालने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, त्याने म्हटले की आमच्या संघाची पकड कमजोर नाही, काही वेळा चुका होतात आणि चूक ही प्रत्येक संघाकडून होते. मात्र आमच्या संघातील रेडर आणि डिफेंडर दोघांनीही शानदार प्रदर्शन केले होते त्यामुळे संघाने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. तर यावेळी देखील आमची तयारी चांगली झाली आहे. आम्ही मागील हंगामाप्रमाणेच खेळणार आहोत यावेळी आम्हाला दिल्लीसाठी ट्रॉफी जिंकायची आहे.”

सर्व संघ मोठ्या कालावधीनंतर मैदानात उतरणार आहेत. आम्ही सलग सराव करत आहे आणि वेगवेगळ्या संघासोबत खेळत आलो आहे. वर्षभर आमचा सराव चालू असतो. त्यामुळे सर्व खेळाडू एकमेकांना चांगल्या पध्दतीने ओळखतात. असे जोगिंदरने आणखी म्हटले.

“माझा मुलगा माझ्यासोबत खेळतोय, मला खूप छान वाटतंय. ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आम्ही गावात राहतो, तिथे सतत आमचा सराव चालू असतो. कोरोना काळात देखील आमचा सराव चालू होता.” असे जोगिंदरने आणखी सांगितले.


हे ही वाचा: http://Ashes Series 2021 AUS vs ENG: पॅट कमिन्स बॉक्सिंग-डे कसोटीसाठी सज्ज; तयारीलाही केली सुरूवात


 

First Published on: December 18, 2021 6:57 PM
Exit mobile version