बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनने क्रीडा स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. वेदांत एक उत्तम जलतरणपटू असून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने पदकं मिळवले आहेत. महाराष्ट्रासाठी त्याने ५ गोल्ड आणि २ सिल्व्हर असे मिळून ७ पदकं मिळवली आहेत.
मध्य प्रदेशात झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत वेदांतने दैदीप्यमान कामगिरी केली आहे. महाराष्ट्राकडून या स्पर्धेत वेदांत सहभागी झाला होता. आर माधवनने आपल्या मुलाच्या यशाबद्दल सोशल मीडियावर ट्वीट करून आनंद व्यक्त केला आहे.
VERY grateful & humbled by the performances of @fernandes_apeksha ( 6 golds,1 silver,PB $ records)& @VedaantMadhavan (5golds &2 silver).Thank you @ansadxb & Pradeep sir for the unwavering efforts & @ChouhanShivraj & @ianuragthakur for the brilliant #KheloIndiaInMP. So proud pic.twitter.com/ZIz4XAeuwN
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) February 12, 2023
अपेक्षा फर्नांडिस आणि वेदांत यांची कामगिरी पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी शिवराज सिंह चौहान आणि अनुराग ठाकूर यांचे आभार मानतो, ज्यांनी हे अतिशय सुंदर पद्धतीने आयोजित केले आहे, असं ट्वीट आर माधवनने केलं आहे. तर देवाच्या कृपेने १०० मीटर, २०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये गोल्ड. तसेच ४०० आणि ८०० मीटरमध्ये सिल्व्हर पदक जिंकल्याची माहितीही त्याने ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.
With gods grace -Gold in 100m, 200m and 1500m and silver in 400m and 800m . 🙏🙏🙏👍👍 pic.twitter.com/DRAFqgZo9O
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) February 12, 2023
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. यंदा जलतरण संघाने १ ट्रॉफी आणि २ एकूण चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकल्या आहेत. भारतासाठी वेदांतला ऑलिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकायचे आहे, असं आपलं ध्येय असल्याचं वेदांतने म्हटलं आहे.
हेही वाचा : सुशांत चौगुले ठरला ‘आरएमभट श्री’ चा मानकरी