राहुल द्रविड यांना कोरोनाचा संसर्ग, लक्ष्मणही झिम्बाब्वेत; भारतीय संघाचं प्रशिक्षकपद नेमकं कोणाकडे?

राहुल द्रविड यांना कोरोनाचा संसर्ग, लक्ष्मणही झिम्बाब्वेत; भारतीय संघाचं प्रशिक्षकपद नेमकं कोणाकडे?

भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे व्हीएस लक्ष्मणही झिम्बाब्वेमध्ये आहेत. परंतु अजूनपर्यंत भारताच्या प्रशिक्षकपदाची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद नेमकं कोणाकडे आहे, याबाबत सर्वांना प्रश्न पडला होता. मात्र, बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.

भारतीय संघ राहुल द्रविड यांच्याशिवाय युएईत दाखल झाला आहे. द्रविड यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते अद्यापही भारतातच आहेत. त्यामुळे नवीन प्रशिक्षकांची निवड करायची की नाही, याबाबत बीसीसीआय विचार करत आहे. परंतु द्रविड यांच्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारताचे प्रशिक्षक होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. तरीसुद्धा बीसीसीआयकडून अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

लक्ष्मण झिम्बाब्वेहून थेट दुबईला जाणार की नाही याबाबत आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही. पण याबाबत काही तासांमध्येच निर्णय घेतला जाईल आणि गरज पडल्यास लक्ष्मण संघात सामील होतील, असं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय संघासोबत सहाय्यक प्रशिक्षकही युएईला दाखल झाले आहेत.

भारताचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून माजी वेगवान गोलंदाज पारस म्हाम्ब्रे हे काम पाहत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत भारतीय संघाला कोण मार्गदर्शन करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मात्र, पारस हे भारतीय संघाचे प्रभारी प्रशिक्षक होऊ शकतात, असं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या सीजनला ईडन गार्डनमध्ये होणार सुरुवात, ‘हे’ संघ भिडणार आमनेसामने


 

First Published on: August 23, 2022 8:08 PM
Exit mobile version