घरक्रीडालेजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या सीजनला ईडन गार्डनमध्ये होणार सुरुवात, 'हे' संघ भिडणार...

लेजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या सीजनला ईडन गार्डनमध्ये होणार सुरुवात, ‘हे’ संघ भिडणार आमनेसामने

Subscribe

लेजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या सीजनला १६ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डनमध्ये पहिला सामना खेळवल्यानंतर लखनौ, दिल्ली, कटक आणि जोधपुर या ठिकाणी देखील सामने खेळवले जाणार आहेत. लीगच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली आहे.

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे हा सामना खेळवला जात आहे. हा सामना 16 सप्टेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डनमध्ये इंडिया महाराजा विरुद्ध वर्ल्ड जाएंट्स यांच्यात खेळवला जाणार आहे. यावेळी भारतीय संघ अर्थात इंडिया महाराजा संघाची धुरा सौरव गांगुलीकडे असणार आहे.

- Advertisement -

सौरव गांगुली भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहेत. तर लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये वर्ल्ड टीमकडून 10 देशातील खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतीय संघासह यामध्ये इंग्लंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या यांसारख्या देशातील खेळाडूंचा समावेश असणार आहे.

असे असणार दोन्ही उभय संघ –

- Advertisement -

इंडिया महाराजा संघ:

सौरव गांगुली (कर्णधार), वीरेंद्र सहवाग, मोहम्मद कैफ, यूसुफ पठान, एस बद्रीनाथ, इरफान पठान, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंत, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक डिंडा, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंह, जोगिंदर शर्मा.

वर्ल्ड जायंट्स:

इयॉन मॉर्गन (कर्णधार), लेन्डले सिमन्स, जॅक कालिस, शेन वॉटसन, मॅट प्रायर, नाथन मैक्क्युलम, जोंटी रोड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकदजा, डॅनियल व्हेटोरी, मशरफे मुर्तजा, असगर अफगान, मिचेल जॉनसन, ब्रेट ली, केविन ओब्रायन, दिनेश रामदीन.


हेही वाचा : वाईट बातमी! प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह, ‘आशिया चषक’साठी जाणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -