T20 world cup 2021: विराट कोहलीला राहुल गांधींचा पाठींबा म्हणाले….

T20 world cup 2021: विराट कोहलीला राहुल गांधींचा पाठींबा म्हणाले….

भारतीय संघाचा सुरू असलेल्या विश्वचषकात पहिल्या दोन्ही सामन्यात दारूण पराभव झाला. त्यावर भारतीय संघाला अनेक माध्यमातून ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानविरूध्दच्या पराभवानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सोशल मीडियावरून त्याच्या धर्माच्या नावावरून त्याला डिवचण्यात आले होते. त्यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मोहम्मद शमीच्या मदतीला आला होता. याच्यावर काही लोकांनी विराटच्या ९ महिन्यांच्या मुलीवर देखील अर्वाच्य भाषेत टिप्पणी केली. यावर दिल्ली महिला आयोगाकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणी नंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विराटच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या घटनेची दखल दिल्ली महिला आयोगाने घेतली असून दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीस देऊन आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी कोहलीला पाठिंबा देणारे ट्विट करत कोहलीला आधार दिला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘प्रिय विराट, काही लोक द्वेषाने भरलेली आहेत कारण त्यांना कोणीही प्रेम देत नाही. त्यांना क्षमा करा आणि तुम्ही भारतीय संघाचे रक्षण करत रहा.’


हेही वाचा – VVS Laxman : पहिल्यांदाच भारतीय फलंदाजांच्या चेहऱ्यावर भीती; वीवीएस लक्ष्मण ने व्यक्त केली चिंता


 

First Published on: November 2, 2021 8:26 PM
Exit mobile version