मर्यादित षटकांच्या प्रकारात धोनी महान कर्णधार, रवी शास्त्रींनी केलं धोनीचे कौतुक

मर्यादित षटकांच्या प्रकारात धोनी महान कर्णधार, रवी शास्त्रींनी केलं धोनीचे कौतुक

मर्यादित षटकांच्या प्रकारात धोनी महान कर्णधार, रवी शास्त्रींनी केलं धोनीचे कौतुक

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, वर्ल्ड कप विजेता महेंद्र सिंह धोनी मर्यादित षटकांच्या प्रकारात मर्यादित षटकांच्या प्रकारात धोनी महान कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ २००७ मध्ये टी-२० वर्ल्ड कप, २०११ मध्ये वनडे वर्ल्ड कप आणि २०१३ चॅम्पियन ट्रॉफी जिंकला असल्याचे रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. धोनीने आतापर्यंत सर्व काही मिळवले जे की एक कर्णधार मर्यादित षटकांच्या प्रकारात करु शकतो. धोनीने केलेल्या विक्रमांवरुन सर्व काही समजते की, त्याने आतापर्यंत कोणता सामना जिंकला नाही? धोनी अनेक सामने जिंकला असल्याचे रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी असे म्हटलं आहे की, धोनी आतापर्यंतच्या मर्यादित षटकांच्या प्रकारात सर्वात महान कर्धार आहे. आयसीसी स्पर्धेत त्यांचा विक्रम पाहा, धोनीने काय जिंकले नाही असे काहीच नाही. आयपीएल, चॅम्पियन्स लीग, सर्व आयसीसी सामने, दोन वर्ल्ड कप, मर्यादित षटकांच्या प्रकाराबाबत सांगायचे झाले तर धोनीच्या जवळही कोणी फिरकले नाही. यामुळे धोनीला आपण किंग काँन्ग म्हणून शकतो. अशा शब्दात रवी शास्त्री यांनी धोनीची स्तुती केली आहे.

महेंद्रसिग धोनीचा शांत स्वभाव आणि सामन्यादरम्यानच्या स्थितीवर असलेलं नियंत्रणामुळे सर्वांपेक्षा वेगळा कर्णधार म्हणून ओळखला जातो. धोनीला जर कर्णधाराची भूमिका बजावताना पाहिले आणि आयपीएलमध्ये सीएसकेचे कर्णधारपणा पाहिला तर स्थिती आणि नियंत्रण तसेच शांती पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघ जरी षटकार आणि चौकार मारत असला तरी धोनी शांत स्वभावामध्ये सर्व नियम घेत असतो असे रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

हार्दिक पांड्याला दिलासा

आयपीएलच्या १४ व्या हंगामात हार्दिक पांड्या आपल्या खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी झाला आहे. सोशल मीडियावर हार्दिक पांड्याच्या खेळीवर टीका करण्यात येत आहे. त्याच्या खराब कामगिरीमुळे संघाबाहेर काढण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हार्दिक पांड्याच्या बाजूने मत मांडले असून सामना पलटवणारा खेळाडू असे वर्णन केलं आहे. हार्दिक पांड्या आत्मविश्वासू खेळाडू आहे. हार्दिक पांड्या आपल्या जुन्या फॉर्ममध्ये आल्यास एकट्याच्या जोरावर मुंबईला विजय मिळवून देईल असा विश्वास रवी शास्त्रींनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा : भारतीय नेमबाजांची ४ सुवर्ण पदकांची कमाई, गुणतालिकेत मिळाले अव्वल स्थान


 

First Published on: October 3, 2021 6:32 PM
Exit mobile version