घरक्रीडाISSF Junior World Cup : भारतीय नेमबाजांची ४ सुवर्ण पदकांची कमाई, गुणतालिकेत...

ISSF Junior World Cup : भारतीय नेमबाजांची ४ सुवर्ण पदकांची कमाई, गुणतालिकेत मिळाले अव्वल स्थान

Subscribe

मनु भाकरची एकाच दिवसात २ सुवर्ण कमाई

स्टार नेमबाज मनु भाकरच्या नेतृत्वामध्ये भारतीय नेमबाजांनी आयएसएसफ ज्यूनियर वर्ल्ड कपमध्ये ६ सुवर्णपदकांपैकी ४ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तसेच गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानी पोहचला आहे. भारत आतापर्यंत आयएसएसफ ज्यूनियर वर्ल्ड कपमध्ये एकूण १४ पदके जिंकले आहेत. १० मीटर एयर पिस्तुल स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करुन क्लीन स्वीप दिला आहे. यामध्ये महिलांच्या जोडीचा समावेश आहे. भारतीय पुरुष स्पर्धक गटाने १० मीटर रायफल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीने सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. या स्पर्धेत भारत आतापर्यंत ६ सुवर्ण पदक जिंकण्यात यशस्वी झाला आहे. तर ६ सिल्व्हर आणि दोन ब्रॉन्झ पदक भारताने पटकवली आहे.

अमेरिका दुसऱ्या स्थानावर

आयएसएसफ ज्यूनियर वर्ल्ड कपमधील पदक यादी पाहिली तर अमेरिका पहिल्या स्थानावरुन घसरुन दुसऱ्या स्थानी आली आहे. भारत पहिल्या स्थानी आहे. आतापर्यंत अमेरिकेने या स्पर्धेमध्ये ४ सुवर्ण, ४ सिल्व्हर आणि दोन ब्रॉन्झ पदक जिंकली आहेत.

- Advertisement -

मनु भाकरची एकाच दिवसात २ सुवर्ण कमाई

भारताची स्टार नेमबाज मनु भाकरने एकाच दिवसात २ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. अशा प्रकारे भाकरच्या चॅम्पियनशिपमधील सुवर्ण पदकांची एकूण संख्या ३ झाली आहे. भाकरने सरबजोत सिंहसोबत संयुक्त टीम स्पर्धा जिंकल्यानंतर रिदम सांगवाण आणि शिखा नारवाल यांच्यासोबत १० मीटर एयर पिस्तुल महिला टीम स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. भारताने सुवर्ण पदकाच्या लढतीमध्ये बेलारुसला १६-१२ अशा फरकाने हरवले आहे. तसेच नवीन, सरबजोत सिंह आणि शिव नरवालच्या पुरष संघानेही बेलारुसला १६-१४ अशा फरकाने पराभूत करुन सुवर्ण कमाई केली आहे. पहिले पुरुषांच्या संघाने १० मीटर एयर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले यानंतर महिलांच्या टीमने १० मीटर एयर रायफलमध्ये सिल्व्हर पदक जिंकले आहे.


हेही वाचा : IPL 2021 : सेहवाग २२ वर्षीय वेगवान गोलंदाजाचा झाला फॅन, म्हणाला टीम इंडियाचे भविष्य

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -