रवी शास्त्रीला प्रशिक्षकपदावरून हटवा – चेतन चौहान

रवी शास्त्रीला प्रशिक्षकपदावरून हटवा – चेतन चौहान

सौजन्य - DNA

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत भारताच्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले नाही. तसेच भारताचा प्रशिक्षक रवी शास्त्री यानेही काही चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे भारताचे माजी क्रिकेटर चेतन चौहान यांनी रवी शास्त्रीला प्रशिक्षकपदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

शास्त्री चांगला समालोचक पण प्रशिक्षक नाही

उत्तर प्रदेशचे क्रीडामंत्री चेतन चौहान म्हणाले, “रवी शास्त्रीला ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी प्रशिक्षकपदावरून काढण्याची गरज आहे. शास्त्री चांगला समालोचक आहे आणि त्याला तेच करू द्या. त्याला प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्याची काही आवश्यकता नाही.”

 

चेतन चौहान (सौजन्य-Jansatta)

१९८० मधील भारतीय संघ सर्वोत्तम 

इंग्लंडविरुद्धच्या मालिका गमावली तरी रवी शास्त्री यांनी सध्याचा भारतीय संघ हा मागील १०-१५ वर्षात परदेशात खेळणारा सर्वोत्तम भारतीय संघ असल्याचे म्हटले होते. पण चेतन चौहान यांना हे मान्य नाही. ते म्हणाले, “शास्त्रीच्या मताशी मी सहमत नाही. माझ्यामते १९८० मधील भारतीय संघाने परदेशात सर्वात चांगले प्रदर्शन केले होते. या संघात अनेक मोठेमोठे खेळाडू होते.”
First Published on: September 17, 2018 10:17 PM
Exit mobile version