वनडे, टी-२० संघात पंतला ‘या’ फलंदाजाच्या जागी संधी मिळाली पाहिजे – हॉग     

वनडे, टी-२० संघात पंतला ‘या’ फलंदाजाच्या जागी संधी मिळाली पाहिजे – हॉग     

रिषभ पंत 

रिषभ पंतमध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. तो मॅचविनर आहे. त्यामुळे त्याचे भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात पुनरागमन झाले पाहिजे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने व्यक्त केले. नुकताच भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा पार पडला. या दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी पंतची भारतीय संघात निवड झाली नव्हती. मात्र, त्यानंतरच्या कसोटी मालिकेत त्याने अप्रतिम खेळ केला. त्याने या मालिकेदरम्यान आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्यामुळे त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुन्हा संधी मिळाली पाहिजे, असे हॉगला वाटते. पंतने आतापर्यंत भारताकडून १६ एकदिवसीय आणि २८ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे अवघड

पंतचे भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात पुनरागमन झाले पाहिजे. भारताने श्रेयस अय्यर किंवा संजू सॅमसनला वगळून पंतला एकदिवसीय आणि टी-२० संघात संधी दिली पाहिजे. त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे फार अवघड आहे. कारण, मैदानाच्या चारही कोपऱ्यांमध्ये फटके मारण्याची त्याच्यात क्षमता आहे. तो कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध मोठे फटके मारू शकतो, असे हॉग म्हणाला.

आत्मविश्वास वाढला असेल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतने दोन मॅचविनिंग खेळी केल्या. भारताचे प्रतिनिधित्व करताना ऑस्ट्रेलियात इतकी चांगली कामगिरी करणे सोपे नाही. या कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. याचा फायदा त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही होऊ शकेल, असेही हॉगने सांगितले.


हेही वाचा – मोहम्मद सिराजने केली ‘ही’ लक्झरी कार खरेदी


 

First Published on: January 23, 2021 6:50 PM
Exit mobile version